21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडकोरोनाने ३८ व्यक्ती बाधित;५४ झाले बरे

कोरोनाने ३८ व्यक्ती बाधित;५४ झाले बरे

एकमत ऑनलाईन

नांदेड : सध्या कोरोना बाधितांच्या संख्येत घटन कायम आहे.जिल्ह्यात गुरूवारी प्राप्त झालेल्या १ हजार ८१५ अहवालापैकी ३८ अहवाल कोरोना बाधित आले आहेत.तर उपचाराअंती बरे झालेल्या ५४ जणांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या ३४२ रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत.यातील दोघांची प्रकृती गंभीर बनली आहे.

नविन बाधितांत आरटीपीसीआर तपासणीद्वारे ७ तर अँटिजेन तपासणीद्वारे ३१ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ९१ हजार ३१ एवढी झाली असून यातील ८८ हजार २२७ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला ३४२ रुग्ण उपचार घेत असून २ बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या १ हजार ९०० एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा ३, मुखेड तालुक्यांतर्गत १, नांदेड ग्रामीण १, अधार्पूर १, हदगाव १ तर अँटिजन तपासणीद्वारे नांदेड मनपा ८, लोहा १, नांदेड ग्रामीण ४, मुदखेड १, कंधार १३, परभणी १, किनवट २, यवतमाळ १ असे एकूण ३८ बाधित आढळले.

जिल्ह्यातील ५४ कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ३, मुखेड कोविड रुग्णालय २, बिलोली तालुक्यातर्गंत १, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे २, देगलूर कोविड रुग्णालय १, खाजगी रुग्णालय ५, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर ३७, हदगाव कोविड रुग्णालय ३ व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

सध्या ३४२ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी १०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल २२, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर २, किनवट कोविड रुग्णालय ६, देगलूर कोविड रुग्णालय २, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण २४१, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ४९, खाजगी रुग्णालय १० व्यक्ती उपचार घेत आहेत. आज रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे १२४, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे १३० खाटा उपलब्ध आहेत.

शहरातील रूग्णालयांनी जादा आकारलेले २ कोटी अडीच लाख केले कमी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या