28.1 C
Latur
Thursday, October 22, 2020
Home नांदेड यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट

यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट

एकमत ऑनलाईन

नांदेड :आध्यात्मिक उत्साहाला प्रतिबिंबीत करणारा उत्सव म्हणून गणेशोत्वाकडे पाहिजे जाते.मात्र यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे मुर्तीकार,सजावटकार यांच्यावर आर्थिक संकट आले आहे. तर भाविकांचाही मोठा हिरमोड झाला आहे. दरम्यान यावर्षी कोविड -१९ या संसर्गजन्य प्रादुभार्वामुळे प्रत्येक नागरिकांनी स्वयंशिस्तीला अधिक प्राधान्य देण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक गणेश मंडळ पुर्वनियोजन आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रत्येक नागरिकांचे जबाबदार वर्तन अपेक्षित आहे. सार्वजनिक पातळीवर लोकसहभागातून लोकांच्या इच्छेनुसार जी कांही वर्गणी गोळा होईल त्यातील वर्गणीचा कांही भाग हा वैद्यकीय उपकरणांसाठी रुग्णालयांना दिल्यास ती ख-या अथार्ने विवेकाचे प्रतिक ठरेल असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यातील गणेश मंडळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत साधेपणावर भर देवून शासनाने आखून दिलेल्या नियम व अटीच्या चौकटीत हा उत्सव साजरा करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान चालू वर्षातील अनेक मोठया व महत्वाच्या सणांवर कोरोनाचे सावट होते आणि सध्या कायम आहे. आध्यात्मिक उत्साहाला प्रतिबिंबीत करणारा व विघ्न हर्ताचा उत्सव म्हणून गणेशोत्साकडे पाहिले जाते मात्र यंदाच्या गणेशोंत्सवावर कोरोनाचेच विघ्न आले आहे.यामुळे मुर्तीकार, सजावटकार, छोटे व्यवसायीक यांच्यावर आर्थिक संकट आले आहे.तर

भाविकांही मोठा हिरमोड झाला आहे.परंतू या सर्व परिस्थितीवर मात करित,खबरदारीचे सर्व नियम पाळत गणेशोत्सव साजरा करावी लागणार आहे.यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी या गणेशोत्वासाठी काही अटी व शर्ती निश्चित केल्या आहेत. यात सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासनाची त्यांचे स्थानिक धोरणानुसार यथोचित पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. कोविडमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावषीर्चा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी. श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट व घरगुती गणपतीसाठी २ फुटाच्या मर्यादित असावी.यासह अन्य अटींचा समावेश आहे.

गणेशोत्सवासाठी या आहेत अटी व शर्ती
श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन केबल नेटवर्क वेबसाईट व फेसबुक इत्यादींद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. गणपती मंडपामध्ये निजंर्तुकीकरण करावे तसेच थर्मल स्क्रीनिंग ची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टेंसिंग) तसेच स्वच्छतेचे नियम मास्क, सॅनिटायझर इत्यादी पाळले जाईल, याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. श्रीच्या आगमन व विसर्जनाची मिरवणूक काढण्यात येऊ नये. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्यादृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आदींच्या मदतीने कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी.

Read More  माहूरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जण बाधित

ताज्या बातम्या

मुंबई बत्ती गुलप्रकरणी ७ दिवसांत अहवाल सादर करा – ऊर्जा मंत्र्यांचे निर्देश

मुंबई - मुंबईत वीज पुरवठा खंडीत झाल्याप्रकरणी विशेष समितीची स्थापन करण्यात येणार आहे. तसेच सात दिवसांत याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री...

घसा बसलाय ? कोमट पाणी प्या

पाटणा : बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची फेक सुरू आहे. मात्र राजकारणानंतर सुुखदु:खाचे प्रसंग असतील तेव्हा एकमेकांची...

मोदी सरकारकडून ३० लाख कर्मचा-यांना बोनस

नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे चक्र संथ झालं आहे. अर्थव्यवस्थेला उभारी यावी यासाठी केंद्रसरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून...

…उम्मीद पे दुनिया कायम है!

कोरोनाविरोधात लस येईपर्यंत ‘मास्क’ हीच आपल्यासाठी लस असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वरचेवर मोठी वाढ होत असल्याचे सांगण्यात येत...

‘ईएसजी’च्या अंतरंगात

शेअर बाजारातील गुंतवणुकीचा विषय येताच ज्या कंपन्या आर्थिकदृष्ट्या सुदृढ आहेत, त्यांचाच पर्याय पुढे येतो. परंतु एक जबाबदार नागरिक म्हणून आपण बिगरवित्तीय निकषांकडे म्हणजेच पर्यावरणीय...

अनलॉकनंतरही आधार हवाच!

काही आठवड्यांपूर्वी २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीची जीडीपीसंदर्भातील आकडेवारी जाहीर झाली आणि ती अर्थव्यवस्थेची पीछेहाट दाखविणारी होती. जीडीपीचा वृद्धीदर उणे २३.९ टक्क्यांवर घसरल्याचे...

सरकारने नुकसानीच्या मदतीसाठी कृतीवर भर द्यावा

अहमदपूर (रविकांत क्षेत्रपाळे) : हे सरकार शेतक-याच्या खरेच पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. जिल्ह्यात शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे करा पण शेतक-यांना बोलण्यापेक्षा...

पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून ऑफर

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेश करण्याचा निर्णय घेत भाजपाला मोठा धक्का दिला आहे. खडसेच्या यांच्या पक्ष प्रवेशाची माहिती देताना आणखी...

कोरोना प्रतिबंधक लस आल्यावर आरोग्य कर्मचा-यांना प्राधान्य !

मुंबई, दि. २१(प्रतिनिधी)- कोरोनाच्या विषाणूची एकीकडे युध्दपातळीवर मुकाबला करण्यात शासकीय यंत्रणा गुंतल्या आहेत. तर दुसरीकडे सर्वांचेच लक्ष कोरोनाच्या लसीकडे लागले आहे. आयसीएमआरकडून कोरोना प्रतिबंधक...

खासगी क्षेत्रातील नोकरदारांनाही मिळणार लोकल प्रवासाची मुभा !

मुंबई, दि. २१ (प्रतिनिधी) सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा मिळाल्यानंतर आता खासगी क्षेत्रातील नोकरदारांनाही लोकल प्रवासाची मुभा देण्याचा विचार सुरू झाला आहे....

आणखीन बातम्या

१0३ कोरोना बाधितांची भर तर दोघांचा मृत्यू

नांदेड : जिल्ह्यात २0२ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना बुधवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर १0३ व्यक्तींचे अहवाल बाधित आले असून उपचार...

शेतक-यांच्या मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा : खा.पाटील

वाई बाजार : अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे लोकसभा मतदार संघातील किनवट,माहूर तालुक्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे . नुकसानग्रस्त भागाची खा.हेमंत...

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करुन भरपाई द्या

नांदेड : मराठवाड्यामध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी ढगफुटी झाली. त्यामुळे खरीप पिकांचा हातातोंडासी आलेला घास हिरावून घेतला गेला. अनेक रस्ते आणि...

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; खा.चिखलीकर यांची मागणी

नांदेड : मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतक-यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक...

शेतकऱ्यांना मदत नाही होत तर सरकारने राजीनामा द्यावा आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी – डॉ. धर्मराज चव्हाण

कंधार (सय्यद हबीब) : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे प्रशासन आणि राजकीय व्यवस्था बांधावर न जाता पंचनामे सुरू आहेत या कुंभकर्णी...

हदगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी – युवक कॉग्रेसची मागणी

हदगाव : गेल्या काही दिवसांपासून सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हदगाव तालुकाओला दुष्काळ जाहीर करून...

विकास निधीसाठी कोणाकडे जाण्याची गरज नाही

लोहा : शहराच्या विकास कामांच्या निधीसाठी कोणाच्याही दारात जाण्याची गरज नाही. प्रतापराव पाटील चिखलीकर सक्षम आहे,असा टोला आ.शिंदे यांना नाव न घेता लगावला.तर नगरपालिका...

कोरोनाबाधितांचे पुन्हा शतक पार; पाच जणांचा मृत्यू

नांदेड : कोरोना अहवालानुसार सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात २१२ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. १०१ व्यक्तींचे अहवाल बाधित आल्याने...

परीक्षांचा गोंधळ ; विद्यापीठासमोर निदर्शने

नांदेड : करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातंर्गत अंतिम वर्षाच्या परीक्षा चालू आहेत. या आनॅलाईन,ऑफलाईन परिक्षेचा गोंधळ उडत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक...

नगरपरीषदेच्या बनावट कागदपत्रांच्या प्रकरणातील आरोपी अटक

धर्माबाद (प्रतिनिधी) येथील नगरपरीषदेतील काही कर्मचारी व शहरातील काही दलालांनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारावर दस्तनोंदणी करून करोडो रुपयांचे चांगभले करून घेतले होते.सदरील प्ररकरणातील...
1,308FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...