28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeनांदेडनांदेडात कोरोना २ हजार पार

नांदेडात कोरोना २ हजार पार

एकमत ऑनलाईन

नांदेड :कोरोना विषाणूला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र दिवसेंदिवस कोरोना विषाणूचे रूग्ण वाढत आहेत. रविवारी प्राप्त झालेल्या ५७६ अहवालापैकी ४०७ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १७० अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत्.ा त्यामुळे जिल्ह्यात रूग्णसंख्या २१५६ एवढी झाली आहे. उपचारादरम्यान गेल्या २४ तासात जिल्ह्यात ७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. १७ रूग्णांची प्रकृती गंभीर स्वरूपाची असून त्यात ७ महिला व १० पुरूषांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे.

रविवारी प्राप्त झालेल्या कोरोना अहवालात महापालिका क्षेत्रातील रूग्णसंख्या ४५ एवढी असून हदगाव तालुक्यात १ , हिमायतनगर ३, धर्माबाद ३, देगलूर २, लोहा ७, किनवट ४, कंधार २, मुखेड ३५, बिलोली ३३, देवणी जि.लातूर १, वसमत जि.हिंगोली २, परभणी १, तर आरटीपीसी प्रणालीद्वारे तपासण्यात आलेल्या पैकी अर्धापुर २ , बिलोली ९, हिमायतनगर ४, नायगाव ६, किनवट १ , मुखेड १ अशी रूग्ण संख्या असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी येथे १४९ रूग्णांवर उपचार सुरू असून पंजाब कोव्हिड सेंटर ३८१, जिल्हा रूग्णालय ३६, नायगाव कोव्हिड सेंटर ६५, बिलोली कोव्हीड सेटर ३७, मुखेड १०५, लोहा ७, देगलूर ६९, हदगाव ४६, भोकर ३, कंधार १२, धर्माबाद ३३, किनवट १७, अर्धापुर १२७, औरंगाबाद ६, निझामाबाद १, हैद्राबाद २, व मुंबई येथे २ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

गेल्या तीन दिवसापासुन कोरोना विषाणूचे रूग्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यासाठी आणखी प्रयत्न वाढविणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात गेल्या महिन्यात १५ दिवस संचारबंदी लावण्यात आली होती. मात्र रूग्णसंख्या रोखण्यासाठी त्याचा उपयोग झाल्याचे दिसुन येत नाही. अजुनही रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सोशल डिस्टंन्स ठेवुन मार्केट सुरू ठेवले तर फारसा परिणाम होणार नाही. मात्र नागरिक सोशल डिस्टन्स पाळत नाहीत. त्यामुळे रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. असे चित्र दिसुन येत आहेत.
नागरिकांनी आपापल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सोशल डिस्टंन्स ठेऊन, तोंडाला मास्क बांधुन अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराच्याबाहेर पडु नये,असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाकडुन कोरोना रूग्णांच्या आकड्याचा घोळ कायम!
जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रूग्णालय नांदेडच्यावतीने देण्यात आलेल्या रविवारच्या प्रेसनोटमध्ये पॉझिटीव्ह रूग्णसंख्या एका ठिकाणी १७० एवढी दाखविण्यात आलेली आहे तर त्याच प्रेसनोटमध्ये एकुण पॉझिटीव्ह रूग्णसंख्या १९९ अशी दाखविण्यात आली आहे. त्यासमुळे बराच वेळ गोंधळ उडाला होता. याविषयी सोशल मिडीयावर चर्चा रंगली होती. मात्र आरोग्य विभागाकडुन कोणताही समाधानकारक खुलासा करण्यात आला नव्हता.

Read More  चीनची भारतावर हवाई चाल ?

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या