32.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढला : ६० जण बाधित

जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढला : ६० जण बाधित

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोनाचे संकट पुन्हा वाढत आहे,हेच वाढत्या रूग्ण संख्येवरून दिसून येत आहे. रविवार २१ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार ६० व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ३९ तर अ‍ॅटिजेन किट्स तपासणीद्वारे २१ बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या ३६ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मास्कचा वापर करून कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

एकुण १ हजार ३०६ अहवालापैकी १ हजार २४१ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २३ हजार १४९ एवढी झाली असून यातील २२ हजार ४ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण ३४२ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील १४ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविडमुळे जिल्ह्यातील ५९२ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी १, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण १६, किनवट कोविड रुग्णालय ८, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ३, लोहा तालुक्यांतर्गत १, खाजगी रुग्णालय ७ असे एकूण ३६ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९५.०५ टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र २३, धमार्बाद तालुक्यात १, किनवट ८, मुदखेड १, परभणी १, नांदेड ग्रामीण १, हदगाव १, माहूर १, हिंगोली १, आदिलाबाद १ असे एकुण ३९ बाधित आढळले. अ‍ॅटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र १०, हिमायतनगर तालुक्यात १, देगलूर १, किनवट ५, हदगाव ३, उमरी १ असे एकूण २१ बाधित आढळले.

जिल्ह्यात ३४२ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे २९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ३८, किनवट कोविड रुग्णालयात ६, हदगाव कोविड रुग्णालय ७, देगलूर कोविड रुग्णालय ४, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण १७४, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ४५, खाजगी रुग्णालय ३९ आहेत. रविवार २१ फेब्रुवारी २०२१ रोजी ५ वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे १५५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे ६६ एवढी आहे.

मास्क वापरा अन्यथा कारावाई : आयुक्त डॉ.लहाने
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी विना मास्क घराच्याबाहेर पडू नये, अन्यथा त्यांच्याविरूध्द दंड वसूल करण्यात येईल, असे नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांनी सांगीतले. कोरोनाला रोखण्यासाठी शहरातील विविध भागात विना मास्क फिरणा-यांविरूध्द दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी कर्मचारी तैणात आले आहेत. नागरिकांनी मास्क वापरून आपले आरोग्य जपावे ,असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

एकेचाळीस वषार्पासून आमराबाद ग्रा.पं. निवडणूक बिनविरोध

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या