नांदेड : जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रविवारी जवळपास ९० कोरोना बाधितांची भर पडली आहेक़ोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र नागरिक बिनधास्त विनामास्कचे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वावरत आहेत. अनेक कार्यक्रमात ,बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाचा आलेख वाढतच आहे. याची चिंता प्रशासनाला लागली आहे. नांदेड कोरोना अहवालानुसार ९० व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे५२ तर अँटिजेन किट्स तपासणीद्वारे ३८बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या ५० कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
आजच्या १ हजार ८३५अहवालापैकी १ हजार७२१ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २३ हजार ६६४ एवढी झाली असून यातील २२ हजार २७५ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण ५६७ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील १७ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-१९ मुळे जिल्ह्यातील ५९८ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण २१, मुदखेड तालुक्यांतर्गत १, गोकुंदा कोविड रुग्णालय 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल १२, खाजगी रुग्णालय ९, हदगाव कोविड रुग्णालय १ असे एकूण ५० बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९४.१७ टक्के आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 38, बिलोली तालुक्यात १, देगलूर १, हिंगोली २, नांदेड ग्रामीण ७, उमरी १, कंधार १, परभणी 1 असे एकुण ५२ बाधित आढळले. अँटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र २१, भोकर तालुक्यात ३, माहूर ४, नांदेड ग्रामीण २, किनवट ८ असे एकूण ३८ बाधित आढळले.
जिल्ह्यात ५६७ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे ३०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ६१, किनवट कोविड रुग्णालयात २५, मुखेड कोविड रुग्णालय १२, हदगाव कोविड रुग्णालय 5, महसूल कोविड केअर सेंटर ४३, देगलूर कोविड रुग्णालय ९, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण २५२, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ६७, खाजगी रुग्णालय ६३ आहेत. रविवार २८ फेब्रुवारी २०२१ रोजी ५ वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे १५५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे ४३ एवढी आहे.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- २ लाख ३१ हजार ६७ एकुण निगेटिव्ह स्वॅब- २ लाख २ हजार ९४० एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- २३ हजार ६५४ एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- २२ हजार २७५ एकुण मृत्यू संख्या-५९८ उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण ९४.१७ टक्के स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-२२ प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-३९५ रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-५६७ अतिगंभीर प्रकृती असलेले-१७ अशी संख्या आहे.
आंतरराष्ट्रीय संशोधन, शिक्षणाची गरज