नांदेड : नांदेड जिल्ह्यात कोरानाचा कहर सुरूच आहेग़ुरूवारी एकाच दिवसात ३० रूग्ण पॉझिटिव्ह आले़तर दुसºया दिवशी शुक्रवारी नवीन १७ रूग्ण वाढले़यामुळे एकुण रूग्णांची संख्या ५५८ वर पोहचली आहे़तर उपचारा दरम्यानकंधार येथील एका रूग्णांचा मृत्यु झाला आहे़ यामुळे कोरोना बळींची संख्या २५ झाली आहे़ दिवसागणिक कोरानाचे रूग्ण वाढत असल्याने नांदेडकरांवर संकटाचे ढग गडद होत आहेत,असेच म्हणावे लागेल.
कडक लॉकडाऊनचया काळात नांदेड जिल्हयात कोरोना रूग्णांची संख्या बोटावर मोजण्या एवढी होती़मात्र जून महिन्यात कोरोनाचे धक्के सुरू झाले़ जुलै महिन्यात प्रारंभीपासून दोन आकडी संख्येने पॉझिटिव्ह रूग्णांत वाढ होत आहे़यामुळे पाचशेचाआकडा केव्हा पार झाला हे कळालेच नाही़ आता तर चालू आठवड्यातील मंगळवारपासून कोरोनाचा कहच सुरू झाला आहे़बुधवारी ५३ रूग्णांची भर पडली होती
ग़ुरुवार ९ जुलै रोजी सायं सात वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या दोन टप्प्यातील अहवालात ३० नवीन रूग्णांची भर पडली़ यामुळे कोरोनाच्या एकुण रूग्णांची संख्या ५४१ एवढी झाली होती़यात आता शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत १७ नवीन पॉझिटिव्ह रूग्ण वाढले आहेत़यामुळे नांदेड जिल्हयातील एकुण रूग्ण संख्या ५५८ एवढी झाली आहे़ गुरूवारी शहरातील विजय नगर येथील रहिवाशी तथा बाधित रूग्णाचा मृत्यु झाला होता़ सलग दुसºया दिवशी शुक्रवारी कंधार तालुक्यातील इमामवाडी येथील ५२ वर्षीय रूग्णाचा मृत्यु झाला आहे़ यामुळे कोरोना बळींच संख्या २५ एवढी झाली आहे.
कोरोना आजारातून बरे झालेल्या ५ रुग्णांना शुक्रवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामुळे सुट्टी देण्यात आलेल्या आतापर्र्यतच्या रुग्णांची संख्ख्या ३९८ झाली आहे. उर्वरित १७५ रुग्णांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे ५0 रुग्ण, पंजाब भवन कोविड सेंटर येथे ५८, मुखेड २८, नायगाव 0७, जिल्हा रुग्णालय 0५, बिलोली येथे ११, हिमायतनगर 0२, देगलूर 0१, किनवट 0२ व हदगाव येथे 0१ आणि नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयात ४ रुग्ण उपचार घेत आहेत. ६ रुग्ण हे औरंगाबाद येथे संदर्भीत करण्यात आले आहेत.
Read More कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ‘मिशन ब्रेक दि चैन’