30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeनांदेडग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव वाढला

ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव वाढला

एकमत ऑनलाईन

कंधार (सय्यद हबीब) : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासनाने नागरिकांना काही उपाययोजनांचे पालन करण्याचे आव्हान केले असले, तरी ग्रामीण भागातील नागरिक याबाबत फारसे गंभीर नाहीत.यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव पुन्हा वाढत आहे. अनेक नागरिक लक्षणे आढळून आल्यानंतर ही कोरोना टेस्ट करण्याकडे दुर्लक्ष करित असून स्थानिक ग्रामपंचायतीही आवश्यक उपाययोजना करण्या ऐवजी गाफिल राहत आहेत.

भाजीपाला व इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी दुकानासमोर गर्दी करणे, घराबाहेर पडण्यापूर्वी मास्क न वापरणे, कुठेही स्पर्श करणे, हात सॅनिटायझ न करणे किंवा साबणाने न धुने, विनाकारण घराबाहेर पडणे या गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे.याबाबत प्रशासन सतत जनजागृत्ती करित आहे.परंतू नागरिक याकडे दुर्लक्ष करित आहेत. काहीनी मास्क वापरायला सुरुवात केली परंतु त्यांचे मास्क नाक व तोंड उघडे ठेवून हनवूटी झाकणारे ठरत आहे.

आठवडी बाजारा सोबत आर्थिक व्यवहार करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची बँकेच्या शाखांमध्ये या काळात मोठी गर्दी दिसून आली यात महाराष्ट्र ग्रामीण बँक, एसबीआय, या दोन्ही शाखांमध्ये परिसरातील गावातील शेकडो नागरिकांची खाती आहेत खातेदारांनी या काळात ऑनलाईन आर्थिक व्यवहाराला महत्त्व देण्याऐवजी ऑफलाईन व्यवहाराला महत्त्व दिले उभे राहायलाही जागा नसतानाही नागरिकांनी स्वत:च्या व इतरांच्या जीव धोक्यात टाकून त्यांचे व्यवहार करून घेत आहेत.

त्याचबरोबर या काळात नागरिकांचे त्यांच्या नातेवाईकांकडे दुस-्या गावी जाणे, तिथे मुक्काम करणे, लग्नकार्य अथवा अंत्यसंस्कारासाठी सहभागी होणे, शेतीची कामे करण्यासाठी मजुरांची वाहनात दाटीदाटीने ने आण करण्याचे प्रकार सुरूच आहे या सर्व बाबी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला माहीत असूनही कुणीही याला ब्रेक लावण्या साठी पुढाकार घेतला नाही परिणामी प्रत्येक गावातील घरोघरी कोरोनाची ची लक्षणे असलेले रुग्ण आढळून येत असून कोणीही कोरोना टेस्ट करून स्वत:ची काळजी घेण्याची व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची तसदी घेत नाही.

बंदी असतांना बाजार भरला
जिल्हा प्रशासनाने साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये जिल्ह्यातील आठवडी बाजाराला बंदी घातलेली असताना कंधार शहरात सोमवारचा बाजारात गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली. त्यामुळे उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर व प्रभारी मुख्याधिकारी विजय चव्हाण यांनी दुपारी एक नंतर पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन आठवडी बाजार उठवला.

लातुरातील नेत्र व दंत चिकित्सालये ३० एप्रिल पर्यंत बंद, मनपा आयुक्तांचे आदेश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या