30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeनांदेडजिल्ह्यात कोरोना कहर १६५० बाधीत; २७ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोना कहर १६५० बाधीत; २७ जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या ५ हजार ४४१ अहवालापैकी १ हजार ६५० अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ७१३ तर अँटिजेन तपासणीद्वारे ९३७ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ५३ हजार ९९२ एवढी झाली असून यातील ४१ हजार ४४८ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला ११ हजार २७१ रुग्ण उपचार घेत असून १८९ बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

दिनांक ५ ते ८ एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत २७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज रोजी १ हजार ३३० बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी ८, मनपा अंतर्गत एन.आर.आय. भवन व गृह विलगीकरण ९७९, कंधार तालुक्याअंतर्गत २, किनवट कोविड रुग्णालय ११, हिमायतनगर तालुक्याअंतर्गत ३, अधार्पूर तालुक्याअंतर्गत ९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ३२, मुखेड कोविड रुग्णालय ६४, नायगाव तालुक्याअंतर्गत ५, धमार्बाद तालुक्याअंतर्गत ५, देगलूर तालुक्याअंतर्गत १, खाजगी रुगणालय १३०, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ४, हदगाव कोविड रुग्णालय १४, माहूर तालुक्याअंतर्गत ३, बिलोली तालुक्याअंतर्गत ३१, लोहा तालुक्याअंतर्गत २९, असे एकूण १ हजार ३३० बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.७६ टक्के आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात ३८९, बिलोली २, कंधार ७८, मुदखेड १, हिंगोली ३, नांदेड ग्रामीण १०, देगलूर १७, किनवट २१, मुखेड ४४, परभणी २, अधार्पूर १३, हदगाव ८, लोहा १६, नायगाव ४७, अकोला १, भोकर ३५, हिमायतनगर १९, माहूर ३, यवतमाळ ४ असे एकूण ७१३ बाधित आढळले. आजच्या बाधितांमध्ये अ‍ॅन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ३३५, बिलोली ४९, हिमायतनगर २७, माहूर ७, उमरी १७, हिंगोली १, नांदेड ग्रामीण ६६, देगलूर ४१, कंधार २, मुदखेड ४४, यवतमाळ २, अधार्पूर २७, धमार्बाद २९, किनवट ५६, मुखेड ४१, लातूर १, भोकर ५६, हदगाव ४४, लोहा ४३, नायगाव ४८, परभणी १ असे एकूण ९३७ व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत.

जिल्ह्यात ११ हजार २७१ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे २४३, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ११३, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) २२०, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड १४६, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १२३, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १८८, देगलूर कोविड रुग्णालय ५३, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर ११७, बिलोली कोविड केअर सेंटर ३१२, हिमायतनगर कोविड केअर सेंटर २३, नायगाव कोविड केअर सेंटर १५१, उमरी कोविड केअर सेंटर 35, माहूर कोविड केअर सेंटर १९, भोकर कोविड केअर सेंटर २०, हदगाव कोविड रुग्णालय ३४, हदगाव कोविड केअर सेंटर ६९, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १०४, कंधार कोविड केअर सेंटर २०, धमार्बाद कोविड केअर सेंटर ९८, मुदखेड कोविड केअर सेंटर ११, अधार्पूर कोविड केअर सेंटर ४८, बारड कोविड केअर सेंटर 38, मांडवी कोविड केअर सेंटर १२, महसूल कोविड केअर सेंटर १०८, एनआरआय कोविड केअर सेंटर १३२, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 160, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण ४ हजार ६४३, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण २ हजार ४८५, खाजगी रुग्णालय १ हजार ५६४ असे एकूण १० हजार २७१ रुग्ण उपचार घेत आहेत.

आज रोजी सांयकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे १०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे ७, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे ६ खाटा उपलब्ध आहेत.

बनावट कोरोना रिपोर्ट तयार करणारी वात्सल्य पॅथॉलॉजी लॅब पंढरपुरात सील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या