36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeनांदेडकोरोना:नांदेड जिल्ह्याने तीन हजाराचा टप्पा ओलांडला

कोरोना:नांदेड जिल्ह्याने तीन हजाराचा टप्पा ओलांडला

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानूसार नव्या १८२ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. तर पाच जणांचा मृत्यु झाला आहे. नांदेडच्या एकुण बाधित रूग्णांनी आता तीन हजाराचा टप्पाही ओलांडला आहे.

शुक्रवार दि.७ ऑगस्ट रोजी सायं. ६ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार १०८ व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर आजच्या एकूण १ हजार ४५९ अहवालापैकी १ हजार २३४ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता ३ हजार ४२ एवढी झाली असून यातील १ हजार ३२३ एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण १ हजार ५९० बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील ८५ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

गुरुवार ६ ऑगस्ट रोजी हदगाव तालुक्यातील तामसा येथील ७५ वर्षाचा एक पुरुष, भावसार चौक नांदेड येथील ६० वर्षाचा एक पुरुष, कंधार तालुक्यातील कांझी मोहल्ला येथील ४२ वर्षार्ची महिला, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे तर मोमीन गल्ली मुखेड येथील ८६ वर्षाचा एक पुरुष मुखेड कोविड केअर सेंटर येथे, एसव्हीएम कॉलनी ५२ वर्षार्ची एक महिला गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या ११४ एवढी झाली आहे.

आज बरे झालेल्या १०८ कोरोना बाधितांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णूपूरी नांदेड येथील ६, हदगाव कोविड केअर सेंटर १४, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल ६, देगलूर कोविड केअर सेंटर ११, मुंबई येथे संदर्भित १, खाजगी रुग्णालय २५, मुखेड कोविड सेंटर २५, गोकुंदा कोविड केअर सेंटर २, अधार्पूर कोविड केअर सेंटर १, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील १५, औरंगाबाद येथील संदर्भित २ असे एकूण १०८ कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

आरटीपीसीआर तपासणीद्वारे नवीन बाधितांमध्ये नांदेड मनपाक्षेत्र १९, अधार्पूर तालुक्यात ५,बिलोली तालुक्यात १, धमार्बाद तालुक्यात १, कंधार तालुक्यात ३, माहूर तालुक्यात 3, नायगाव तालुक्यात 1, लोहा तालुक्यात ७ , हिंगोली ४, नांदेड ग्रामीण ४, भोकर तालुक्यात १, देगलूर तालुक्यात 3, हदगाव तालुक्यात ७, किनवट तालुक्यात ६, मुखेड तालुक्यात १३, उमरी तालुक्यात १, परभणी १, असे एकूण ८0 बाधित आढळले.

Read More  लोहारा शहरात कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळल्याने परिसर सिल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या