20.9 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात कोरोनाचे तांडव; २४ जणांचा मृत्यू तर १0७९ बाधित

नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे तांडव; २४ जणांचा मृत्यू तर १0७९ बाधित

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचे तांडव तीव्र होत आहे.रूग्ण संख्या काही प्रमाणात कमी झाली असली तरी मृत्युचे प्रमाण वाढतच आहे.बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात २४ जणांचा मृत्यु झाला आहे.तर ३ हजार ९१८ अहवालापैकी १ हजार ७९ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ४६० तर अँटिजेन तपासणीद्वारे ६१९ अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या ४३ हजार ३५ एवढी झाली आहे. एकूण रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली संख्या ही ३१ हजार ८४७ आहे. आज १० हजार १५७ रुग्ण उपचार घेत आहेत. १७२ बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे.

बुधवार ३१ मार्च रोजी २४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या ७९४ एवढी झाली आहे.आज ८५४ कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. यात जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड १५, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण ५६२, मुखेड कोविड रुग्णालय २७, हिमायतनगर तालुक्यातंर्गत २०, धमार्बाद २०, उमरी २१, हदगाव कोविड रुग्णालय ३४, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ६ , भोकर तालुक्यातंर्गत १०, कंधार तालुक्यातंर्गत २७ , माहूर तालुक्यातंर्गत 7, अधार्पूर तालुक्यातंर्गत १८, खाजगी रुग्णालय ८७ असे एकूण ८५४ बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४ टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र २९५, नांदेड ग्रामीण १३, भोकर १०, देगलूर ६, हिमायतनगर ४१, लोहा ३५ , किनवट १३, नायगाव १६, कंधार १४, बिलोली ५५, हदगाव १, मुखेड ८, हिंगोली १, लातूर १, अकोला १ असे एकूण ४६० बाधित आढळले. आजच्या बाधितांमध्ये अ‍ॅन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ३०४, नांदेड ग्रामीण ४०, अधार्पूर तालुक्यात २७, भोकर ११, बिलोली २६, देगलूर २८, धमार्बाद २०, हदगाव १, हिमायतनगर ९, कंधार ३, किनवट ४३, लोहा २६, माहूर ३, मुदखेड १०, मुखेड ३३, नायगाव २०, उमरी ११, उस्मानाबाद १, हिंगोली १, आंध्रप्रदेश १, पुणे १ असे एकूण ६१९ व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत. जिल्ह्यात १० हजार १५७ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे २४०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ८४, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) ९८, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड १२५, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १२२, मुखेड कोविड रुग्णालय २४३, देगलूर कोविड रुग्णालय ४३, हदगाव कोविड रुग्णालय ५०, हदगाव कोविड केअर सेंटर ४०, लोहा कोविड रुग्णालय १०५, कंधार कोविड केअर सेंटर १०, महसूल कोविड केअर सेंटर २०५, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण ५ हजार ९९६, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण १ हजार ८०५, खाजगी रुग्णालय ६४२, बिलोली कोविड केअर सेंटर ३२, जैनब हॉस्पीटल कोविड केअर देगूलर ६४, नायगाव कोविड केअर सेंटर ७६, उमरी कोविड केअर सेंटर २४, माहूर कोविड केअर सेंटर २१, भोकर कोविड केअर सेंटर १७, हिमायत नगर कोविड केअर सेंटर ४, धमार्बाद कोविड केअर सेंटर ५६, मुदखेड कोविड केअर सेंटर ११, अधार्पूर कोविड केअर सेंटर १८, बारड कोविड केअर सेंटर ४, मांडवी कोविड केअर सेंटर २१, लातूर येथे संदर्भित १ असे एकूण १० हजार १५७ कोविड बाधित उपचार घेत आहेत.

बुधवार 31 मार्च रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 9, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे १२ एवढी आहे.

 

सीआययूच्या प्रमुखपदी मिलिंद काथेंची नियु्क्ती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या