30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात कोरोनाचा उच्चांक, १७५९ बाधित; २७ जणांचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा उच्चांक, १७५९ बाधित; २७ जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या ६ हजार ३७अहवालापैकी १ हजार ७५९अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ६८५ तर अँटिजेन तपासणीद्वारे १ हजार ७८अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ५५ हजार ७५१ एवढी झाली असून यातील ४२हजार ७६२ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला ११हजार ६८७ रुग्ण उपचार घेत असून १८९ बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जनतेने अधिक सुरक्षितता बाळगून शासनाने वेळोवेळी जाहिर केलेल्या आदेशाचे पालन करणे सर्वांच्या हिताचे आहे. आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

दिनांक६ ते ९ एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत २७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या १ हजार ५०एवढी झाली आहे. दिनांक ६एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे पुणेगाव नांदेड येथील ६५ वषार्चा पुरुष, मुदखेड तालुक्यातील इजळी येथील ८५वषार्ची महिला, सिडको नांदेड येथील ५५ वषार्चा पुरुष, चैतन्य नगर नांदेड येथील३५वषार्ची महिला, नायगाव येथील ७४ वषार्ची महिला, धनेगाव नांदेड येथील ४६ वषार्चा पुरुष , तेहरानगर नांदेड येथील ३५ वषार्चा पुरुष, उमरी येथील ३० वषार्चा पुरुष, खडकपुरा येथील७० वषार्चा पुरुष, नांदेड येथील ७५ वषार्चा पुरुष, ७ एप्रिल रोजी देगलूर कोविड रुग्णालय येथे गोकुळनगर देगलूर येथील ५० वषार्चा पुरुष, व्हिजन कोविड रुग्णालय येथे नायगाव तालुक्यातील हंगरगा येथील ७९ वषार्चा पुरुष, ८एप्रिल रोजी हदगाव कोविड रुग्णालय येथे हिमायतनगर तालुक्यातील चाकरी येथील ६४ वषार्ची महिला, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे मंत्री नगर नांदेड येथील ७४ वषार्चा पुरुष यशोसाई रुग्णालय नांदेड येथे जुना कौठा नांदेड येथील ७९वषार्चा पुरुष, व्हिजन कोविड रुग्णालय येथे देगलूर तालुक्यातील वझर येथील ५५ वषार्चा पुरुष, ९ एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे प्रभात नगर नांदेड येथील ७४ वषार्ची महिला, अधार्पूर येथील ५८ वषार्ची महिला, लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील ७१ वषार्चा पुरुष, इतवारा नांदेड येथील ६६ वषार्चा पुरुष, चैतन्यनगर नांदेड येथील६४ वषार्ची महिला, देगलूर कोविड रुग्णालय येथे सुगाव येथील ५८ वषार्चा पुरुष, कोत्तेकल्लूर येथील ६४ वषार्चा पुरुष, भगवती कोविड रुग्णालय येथे कौठा येथील ८३वषार्चा पुरुष असे एकूण २७रुग्ण उपचारादरम्यान मृत पावले. आज रोजी १हजार ३१४ बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी २० मनपा अंतर्गत एन.आर.आय. भवन व गृह विलगीकरण ८७०, कंधार तालुक्याअंतर्गत ४किनवट कोविड रुग्णालय २४ हिमायतनगर तालुक्याअंतर्गत २४ खाजगी रुग्णालय १२५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल १७, नायगाव तालुक्याअंतर्गत ४७ , मुखेड कोविड रुग्णालय४१, अधार्पूर तालुक्याअंतर्गत १९शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय २०, हदगाव कोविड रुग्णालय १८, माहूर तालुक्याअंतर्गत ३, धमार्बाद तालुक्याअंतर्गत १० लोहा तालुक्याअंतर्गत ३८, बिलोली तालुक्यातर्गंत३४असे एकूण १ हजार ३१४ बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.७०टक्के आहे.

जिल्ह्यात ११ हजार ६८७बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 262, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ११८ जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) २२१, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड १७१किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १८८ मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १९६ देगलूर कोविड रुग्णालय ५४, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर १३४, बिलोली कोविड केअर सेंटर ३३६ हिमायतनगर कोविड केअर सेंटर २५, नायगाव कोविड केअर सेंटर १०७ उमरी कोविड केअर सेंटर २० माहूर कोविड केअर सेंटर २२, भोकर कोविड केअर सेंटर २०, हदगाव कोविड रुग्णालय ३७हदगाव कोविड केअर सेंटर ९८, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १२६कंधार कोविड केअर सेंटर ३१, धमार्बाद कोविड केअर सेंटर ११०, मुदखेड कोविड केअर सेंटर ११अधार्पूर कोविड केअर सेंटर ४१ बारड कोविड केअर सेंटर ४५, मांडवी कोविड केअर सेंटर १४ महसूल कोविड केअर सेंटर १(०५, एनआरआय कोविड केअर सेंटर १०१२, पंजाब भवन कोविड केअर सेंटर १४६ नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण ४ हजार ८१२, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण २ हजार ६१०, खाजगी रुग्णालय १ हजार ५०७असे एकूण ११ हजार ६८७ रुग्ण उपचार घेत आहेत. उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे १०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे ७, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे ६ खाटा उपलब्ध आहेत.

कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या