22.7 C
Latur
Wednesday, August 12, 2020
Home नांदेड नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे हादरे सुरूच

नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे हादरे सुरूच

नव्या १४७ बाधितांची भर तर दोघांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नांदेड:गेल्या तीन दिवसापासून सतत नांदेड जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांचे शतकी हादरे सुरूच आहेत.शनिवार दि.१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ पर्यंत आलेल्या अहवालानूसार नव्या १४७ बाधितांची भर पडली आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.जिल्हयातील एकुण रूग्ण संख्या १ हजार ९८६ होऊन दोन हजाराच्या दारात पोहचली आहे.

जिल्ह्यात दि.१ ऑगस्ट रोजी सायं. ६ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार ४८ व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर १४७ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण १ हजार २८१ अहवालापैकी १ हजार ८८ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता १ हजार ९८६ एवढी झाली असून यातील ९३५ एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण ९५७ बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील १५ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात ७ महिला व ९ पुरुषांचा समावेश आहे.

शुक्रवार ३१ जुलै रोजी दत्तनगर नांदेड येथील ४८ वर्षाचा एक पुरुष जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर शनिवार १ ऑगस्ट रोजी चिरागगल्ली नांदेड येथील ७५ वर्षाचा एक पुरुष डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत पावले. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या ९३ एवढी झाली आहे. आज बरे झालेल्या ४८ कोरोना बाधितांमध्ये मुखेड कोविड केअर सेंटर येथील २२, कंधार कोविड केअर सेंटर येथील ४, बिलोली कोविड केअर सेंटर येथील १,पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील २०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथील १ अशा ४८ कोरोना बाधित व्यक्तींना औषोधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात ९५७ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १३१, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ३३४, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे ४४, नायगाव कोविड केअर सेंटर येथे २४, बिलोली कोविड केअर सेंटर येथे १८, मुखेड कोविड केअर सेंटर येथे ९२, देगलूर कोविड केअर सेंटर येथे ५९, लोहा कोविड केअर सेंटर येथे ५, हदगाव कोविड केअर सेंटर ५0, भोकर कोविड केअर सेंटर ४, कंधार कोविड केअर सेंटर येथे १३, धमार्बाद कोविड केअर सेंटर येथे ५९, किनवट कोविड केअर सेंटर येथे ५, अधार्पूर कोविड केअर सेंटर येथे ३, खाजगी रुग्णालयात १0५ बाधित व्यक्ती उपचार घेत असून ६ बाधित औरंगाबाद येथे, निजामाबाद येथे १ बाधित, हैदराबाद येथे २ तर मुंबई येथे २ बाधित संदर्भित झाले आहेत.

Read More  भारतात व्हेंटिलेटर्सची संख्या पुरेशी असल्याने निर्यातीचा निर्णय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,143FansLike
101FollowersFollow