37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeनांदेडहदगाव तालुक्यात सोमवारपासुन कोरोना लस

हदगाव तालुक्यात सोमवारपासुन कोरोना लस

एकमत ऑनलाईन

हदगाव (गौतम वाठोरे ) : तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सोमवार.८ पासून ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षावरील व्याधिग्रस्त नागरिकांना मोफत कोविड लस देण्याची सुरुवात होणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कदम यांनी दिली आहे. तालुक्यातील तामसा, वायपना बुद्रुक, आष्टी, बरडशेवाळा, कोळी निमगाव या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार पासून कोविडची सुरक्षित लस शासनाच्या आरोग्य विभागामार्फत मोफत देण्यासाठी उपलब्ध होत आहे. आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी पाच यादरम्यान कोविड लसीकरण करण्यात येणार आहे.

केंद्र व राज्य शासनाकडून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी मोफत लसीकरण मोहीम हाती घेऊन त्याची यशस्वीरित्या अंमलबजावणी ग्रामीण भागातील जनतेसाठी केली जात आहे. या लसीकरणाची तयारी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी. आशा वर्कर्स यांना मार्गदर्शक सूचना दिले आहेत.

६० वर्षावरील नागरिक व ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिकांनी कोविड लस चा लाभ घेण्यासाठी प्रथम नोंदणी करिता पॅनकार्ड किंवा आधारकार्ड सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे. ही लस सर्व संबंधितांना मिळणार असून कोणीही वंचित राहणार नसल्यामुळे लस घेण्यासाठी गर्दी टाळून गोंधळ होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कदम व तामसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास बोंदरवाड यांनी केले आहे.

ट्रान्सजेन्डर, सेक्स वर्कर्सना रक्तदानास बंदी नियमास आव्हान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या