24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeनांदेडलोहयात उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा सत्कार

लोहयात उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा सत्कार

एकमत ऑनलाईन

लोहा (युनूस शेख) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता सुरू असलेल्या लॉकडाऊनसारख्या परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व लोकांनी आपल्या घरात सुखरूप राहावे यासाठी विविध रूपाने, विविध मार्गाने अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टर नर्स वाहन चालक सफाई कामगार आदींचा लोहयात काँग्रेसच्या नेत्या तथा माजी आ.अमिता भाभी चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना योद्धयाचा काँग्रेसचे नांदेड दक्षिणचे आ. मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष आयोजक सोनू संगेवार व युवक काँग्रेसचे बाबासाहेब बाबर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम लोहयाच्या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आला होता.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे नांदेड दक्षिणचे आ.मोहन अण्णा हंबर्डे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लोहा पंचायत समितीचे काँग्रेसचे गटनेते श्रीनिवास मोरे,जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर,माजी सनदी अधिकारी अनिल मोरे आदी उपस्थित होते. यावेळी लोहा उपजिल्हा रुग्णालय कोविड सेंटरमध्ये गेले सहा ते सात महिन्यापासून अहोरात्र आपल्या जीवाची पर्वा न करता उत्कृष्ट सेवा करणारे डॉक्टर्स,नर्ड्रा,यव्हर काही सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान कोरोना योद्धा म्हणून आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते करण्यात आला.

यात लोहा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.जाधव,डॉ.सुर्यवंशी,डॉ.पूर्वा सरकार,डॉ.देशमाने, डॉ. मिर्झा मॅडम, डॉ.शारेखा शेख, डॉ.देशमुख मॅडम , डॉ.देशपांडे मॅडम,डॉ.लोहारे,डॉ.शंकरे मॅडम, डॉ.चिगळे मॅडम, डॉ.भालेराव,डॉ गाडेकर, डॉ.जामकर मॅडम , डॉ.राठोड मॅडम, नर्स लोखंडे मॅडम,मयुरी ससाने, अश्विनी जिरेवार,रणवीर,अल्का आठवले, स्वाती गायकवाड,१०८ रुग्णवाहिकेचे प्रमुख सिध्दार्थ ससाने,आतीश चालक,सतीश कबीर,बालाजी घोडके,सचीन गुंडाळे,काँग्रेसचे कार्यकर्ते गजानन कळसकर, डॉ.गवळी,सामाजिक कार्यकर्ते अमोल(ABC) चव्हाण,आदीचा सत्कार शाल पुष्पहार सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे आयोजक काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, युवक काँग्रेसचे बाबासाहेब बाबर,काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंत पवार (बापू), लोहा न.पा.चे काँग्रेसचे गटनेते पंचशील कांबळे,माजी नगरसेवक अनिल दाढेल,शरफोदीन शेख,पांडूरंग दाढेल,भूषण दमकोंडवार,गजानन कळसकर,शिवाजी मुंडे, कैलास मोरे,सचीन बगाडे,अमोल महामुने,सत्तार शेख,व्यंकट पवार,रुपेश चमकुरे,आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना आ.मोहन अण्णा हंबर्डे म्हणाले की, कोरोनाच्या काळात डॉक्टर, नर्स,वाहक,सफाई कामगार आदीने केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा कोरोना योध्दा म्हणून सन्मान देत आहोत खरे म्हणले तर हे कोरोना योध्दा नाही तर कोरोनाला हरविणारे सैनिक आहेत ज्या कोरोनाने भाऊ, बहीण ,आई,वडील, मुलगा, यांना दूर केले त्यांना हरविणारे म्हणजे सैनिक आहेत.देशाचे रक्षण करणाऱ्या सिमेवरच्या सैनिका प्रमाणे यांनी ही कार्य केले. कोरोना झाल्यावर कुणीही जवळ येत नाही.आपण ही जवळ जात नाही. कोरोना काळात पुरूषा पेक्षा जास्त महिला डॉक्टर आहेत ज्या आपल्या मुला बाळांना सोडून कोरोना रूग्णांची सेवा केली त्यांबद्दल मी सर्वांचे आभार मानतो कोरोनाचा नायनाट करण्यासाठी कार्य केल्या.आपण काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्या काँग्रेसच्या नेत्या अमिता भाभी चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम ठेवला अमिता भाभी चव्हाण यांना दीर्घ आयुष्य लाभो असे आमदार मोहन अण्णा हंबर्डे म्हणाले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित आज साहित्यांनद प्रतिष्ठानचे ऑनलाईन कवीसंमेलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या