24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरली

नांदेड जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरली

एकमत ऑनलाईन

नांदेड : गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाची लाट ओसरल्याने नांदेडकरांचा जीव भांडात पडला आहे.मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सुरक्षितेचे नियम पाळण्याचे बंधन कायम आहे.मंगळवारी जिल्ह्यात प्राप्त झालेल्या अहवालात केवळ १ व्यक्ती बाधित आली आहे.तर २ जणांना उपचारानंतर घरी सुट्टी देण्यात आली आहे.

कोरोनाची लाट ओसरल्याने सध्या सर्व व्यवहार सुरळीत होत आहेतग़ेल्या दोन महिन्यात नव्या रूग्णांत आणि मृत्युच्या संख्येत मोठी घट झाली आहे.यामुळे नांदेडकरांचा जीव भांडयात पडला आहे.जिल्हयात मंगळवारी प्राप्त झालेल्या ६३७ अहवालापैकी १ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे १ तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ९० हजार ३०७ एवढी झाली असून यातील ८७ हजार ६३२ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला २४ रुग्ण उपचार घेत असून ४ बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या २ हजार ६५१ एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा १ असे एकूण १ बाधित आढळले. जिल्ह्यातील २ कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण १, खाजगी १ व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. २४ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी ८, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण ११, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ४, खाजगी रुग्णालय १ व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या