21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeनांदेडकोरोनाचा कहर: साडे चार हजाराचा टप्पा ओलांडला

कोरोनाचा कहर: साडे चार हजाराचा टप्पा ओलांडला

एकमत ऑनलाईन

नांदेड :कोरोनाचा कहर सुरूच असून नांदेड जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णांनी साडे चार हजाराचा टप्पा ओलांडला आहे. बुधवार सायंकाळी नव्या २३० व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ८६ तर अ‍ॅटिजेन किट्स तपासणीद्वारे १४४ बाधित आले.तर सहा जणांचा मृत्यु झाला आहे. काही दिवसातील सर्व आकडेवाडी या नव्या बाधितांनी मोडून काढली आहे.

आजच्या एकुण १ हजार ५९ अहवालापैकी ८५७ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता ४ हजार ५५५ एवढी झाली असून यातील २ हजार ७०० बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण १ हजार ६६६ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील १७५ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. मंगळवार १८ ऑगस्ट रोजी लोहा येथील ६५ वर्षाचा एका पुरुष, विष्णुपुरी नांदेड येथील ५२ वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे तर बुधवार १९ ऑगस्ट रोजी आनंदनगर नांदेड येथील ४३ वषार्ची एक महिला, हदगाव तालुक्यातील तामसा येथील ६० वषार्ची एक महिला, विष्णुपुरी नांदेड येथील ५४ वर्षाचा एक पुरुष यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे व वजिराबाद नांदेड येथील ८४ वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्य झाला.

आज बरे झालेल्या १३९ कोरोना बाधितांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णूपूरी नांदेड येथील २, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील १, हदगाव कोविड केअर सेंटर ४, माहूर कोविड सेंटर ३, बिलोली कोविड सेंटर १८, किनवट कोविड सेंटर ४ , नायगाव कोविड सेंटर 12, मुदखेड कोविड सेंटर ७, मुखेड कोविड सेंटर २८ , पंजाब भवन कोविड सेंटर १३, देगलूर कोविड केअर सेंटर ९, धमार्बाद कोविड सेंटर ३१, खाजगी रुग्णालय ३, अधार्पूर कोविड सेंटर ४ असे एकूण १३९ कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र २४, बिलोली तालुक्यात ६, हदगाव तालुक्यात १३, कंधार तालुक्यात १, मुखेड तालुक्यात १, हिंगोली तालुक्यात १ , लातूर १, नांदेड ग्रामीण ३, भोकर तालुक्यात ३, देगलूर तालुक्यात १३, लोहा तालुक्यात ११, नायगाव तालुक्यात ७, परभणी २ असे एकुण ८६ बाधित आढळले.

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ९२, अधार्पूर तालुक्यात २, देगलूर तालुक्यात ५, लोहा तालुक्यात २, मुदखेड तालुक्यात 3, धमार्बाद तालुक्यात १६, उमरी तालुक्यात 6, नांदेड ग्रामीण ५, भोकर तालुक्यात १, कंधार तालुक्यात ३, मुखेड तालुक्यात ६, नायगाव तालुक्यात २, हिंगोली १ असे एकुण १४४ बाधित आढळले. जिल्ह्यात १ हजार ६६६ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १८८, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ७६६, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे ४0, नायगाव कोविड केअर सेंटर येथे ३१, बिलोली कोविड केअर सेंटर येथे ३७, मुखेड कोविड केअर सेंटर येथे १0४, देगलूर कोविड केअर सेंटर येथे ६९, लोहा कोविड केअर सेंटर येथे ५२, हदगाव कोविड केअर सेंटर १२, भोकर कोविड केअर सेंटर २१, कंधार कोविड केअर सेंटर येथे १३, धमार्बाद कोविड केअर सेंटर येथे ९९, किनवट कोविड केअर सेंटर येथे १४, अधार्पूर कोविड केअर सेंटर येथे ३, मुदखेड कोविड केअर सेटर ३१, माहूर कोविड केअर सेंटर येथे ४, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे २१, बारड कोविड केअर सेंटर १, उमरी कोविड केअर सेंटर २५, खाजगी रुग्णालयात १२९ बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित ४, निजामाबाद येथे १, हैदराबाद येथे १ बाधित संदर्भित झाले आहेत.

बीसीसीआय आयोजित करणार निरोपाचा सामना : धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या