नांदेड : नांदेड कोरोना अहवालानुसार ९३ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ४४ तर अँटिजेन किट्स तपासणीद्वारे ४९ बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या ५६कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाची रूग्ण संख्या शतकाजवळ पोहचल्याने चिंता वाढली आहे.
१ हजार ४११अहवालापैकी १ हजार ३१५अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २३ हजार ८३७ एवढी झाली असून यातील २२ हजार ३८५ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण ६३४ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील १८ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.
सोमवार १ मार्च रोजी नांदेड तरोडा बु येथील ७० वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर मंगळवार २ मार्च नांदेड समिराबाग येथील ६५ वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-१९ मुळे जिल्ह्यातील ६०२ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी ६, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण २९, देगलूर कोविड रुग्णालय १, मुखेड कोविड रुग्णालय १ जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ४, किनवट कोविड रुग्णालय ४, कंधार तालुक्यांतर्गत १, खाजगी रुग्णालय १०असे एकूण५६ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९३.९० टक्के आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ३४ लोहा तालुक्यात ३, मुखेड १, लातूर १, नांदेड ग्रामीण १, कंधार २, हिंगोली १, परभणी १ असे एकुण ४४ बाधित आढळले. अँटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ४७, कंधार तालुक्यात १, मुखेड १, हदगाव १, किनवट ५, यवतमाळ ४ असे एकूण ४९ बाधित आढळले.
जिल्ह्यात ३३६ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे ४२, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ७१ किनवट कोविड रुग्णालयात २१, मुखेड कोविड रुग्णालय ६, हदगाव कोविड रुग्णालय ६, महसूल कोविड केअर सेंटर ५३, देगलूर कोविड रुग्णालय९ नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण २५६, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ९३, खाजगी रुग्णालय ७९ आहेत. मंगळवार २ मार्च रोजी सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे १४३, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे ३४ एवढी आहे. जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती एकुण घेतलेले स्वॅब- २ लाख ३२ हजार ५३७ एकुण निगेटिव्ह स्वॅब- २ लाख ४ हजार ४५८ एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- २३ हजार ८३७ एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- २२ हजार ३८५ एकुण मृत्यू संख्या ६०२ उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण ९३.९० टक्के स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-३आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-१५० ग्णालयात उपचार घेत आहेत.
कीर्ती ऑइल मिल व रेसिडेन्सी क्लबला ठोकले सील