22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeनांदेडसार्वजनिक उत्साहावर कोरोनाचे सावट : साध्या पध्दतीने सण-उत्सव साजरे

सार्वजनिक उत्साहावर कोरोनाचे सावट : साध्या पध्दतीने सण-उत्सव साजरे

एकमत ऑनलाईन

कंधार: जुलै महिन्याच्या अखेरीस सण-उत्सवांना सुरुवात होत असताना कोरोनाचे सावट आणखी गडद होताना दिसत आहे़ श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमीत उत्साह दिसून आला नाही़श्रावण महिन्याला सुरुवात होताच धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते़ बाजारपेठेत प्रासंगिक क्षणासाठी लागणारे साहित्य आणि गजबजून खरेदीसाठी वर्दळ असायची मात्र यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने सण उत्सवात विघ्न आलेले दिसून येत आहे.

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी केली जाणारी उपासना अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त मानली गेली आहे. आधात्मिक मान्यता मनाचा स्वामी चंद्राला आत्मिक ऊजार्कारक करण्याचा संदेश देतात. मनावर आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यास यश मिळाल्यास माणूस दुर्बलतेतून उठून सबलतेच्या आकाशात धूंदपणे, स्वच्छंदी विहार करू शकतो. स्वत्वाच्या बोधाचे प्रतीक म्हणून श्रावण महिन्याकडे पाहिले जाते.

व्यापारी व्यावसायिक मागील चार महिन्यापासून आर्थिक मंदीत कसाबसा व्यवसाय करीत आहेत महाराष्ट्राची संस्कृती उत्सवप्रिय असून वृत्त वैकल्पे मोठ्या भक्तिभावाने साजरे करण्याची परंपरा अनादी काळापासून सुरू आहे मात्र यावर्षी कोरोनामुळे धार्मिक स्थळावर होणारी गर्दी दिसून येणार नाही श्रावण समारंभाला सुरुवात झाली की सोमवार शनिवार पूजेसाठी धार्मिक स्थळी भाविकांची गर्दी दिसत होती मात्र सध्या कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला असून या महारामारीत संकट वाढत आहे.

त्यामुळे नागपंचमी श्रावण सोमवार बकरीद रक्षाबंधन श्रीकृष्ण जन्म स्वातंत्र्यदिन पोळा हरितालिका गणेश चतुर्थी असे सण उत्सवावर निर्बंध आले असून यंदा केवळ घरातच साध्या पद्धतीने साजरे करावे लागणार आहे़ त्यामुळे सार्वजनिक उत्सवावर मिळणारा आनंद हिरावला जाणार असून साध्या पद्धतीने सण-उत्सव साजरे करावे लागणार असून आनंदावर विरजण पडण्याची चित्र आहे.

Read More  दर्जाहीन वस्तूंच्या आयातीवर लागणार अंकुश

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या