24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeनांदेडफटाके दुकानांना मनपाचा ग्रीन; तर जिल्हाधिका-यांचा रेड सिग्नल

फटाके दुकानांना मनपाचा ग्रीन; तर जिल्हाधिका-यांचा रेड सिग्नल

एकमत ऑनलाईन

नांदेड : फटाके दुकानांना महापालिकेकडून तात्पुरत्या स्वरूपात परवानगीचा ग्रीन सिग्नल मिळाला मात्र जिल्हाधिका-यांकडून अंतिम परवानगीसाठी तुर्त रेड सिग्नल दाखविला आहे.तरीही हिंगोली गेटजवळील गुरूव्दारा बोर्डाच्या जागेत ५० विके्रत्यांनी बिनधास्तपणे दुकाने थाटली आहेत.यात धक्कादायक बाब म्हणजे सोमवारी एका दुचाकीचालकाने आपल्या सोबत गॅस सिलेंडर घेऊन येथील दुकानांच्या परिसरात फेरफटका मारला. यावेळी एखादी अप्रिय घटना घडली असती तर काय झाले असते,याचा विचार करून अंगावर शहारे येत आहेत.दरम्यान या विना परवानगी फटाके दुकानदारांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्याकडे करण्यात आली आहे.

दरवर्षी दिवाळी निमित्त शहरातील दोन ते तीन ठिकाणी फटाक्यांची दुकाने थाटली जातात.यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदान,पॉलिटेक्नीकल कॉलेज मैदान व हिगोंली गेट येथील गुरूव्दारा बोर्डाच्या जागेवर या फटाके दुकानांना महापालिका व जिल्हाधिका-यांकडून रितसर परवानगी दिली जाते.परंतू काही कारणास्तव कृषी उत्पन्न बाजार समितीची यंदा जागा मिळाली नाही.त्यामुळे हिंगोली गेट येथील जागेवर फटाक्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत.यासाठी महापालिकेने तात्पुरती परवानगी दिली आहे.वास्तविक फटाके दुकानांना परवानगीसाठी महापालिकेच्या मालमत्ता,नगररचना,संबधित झोन कार्यालय,विधी विभाग यांच्याकडून प्रस्ताव जातो.यानंतर फायर विभागाकडून या आधारे एनओसी देवून तो प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला जातो.

यानूसार ही प्रक्रिया पुर्ण करून हिंगोली गेट येथे ५० दुकानांसाठी ग्रीन सिग्नल दाखवत जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्याकडे मनपाने अंतिम परवानगीसाठी प्रस्ताव सादर केला आहे.परंतू जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगीसाठी तुर्त रेड सिग्नल दाखविला आहे.तरीही ही परवानगी मिळण्यापुर्वीच विके्रत्यांनी बिनधास्तपणे फटाके दुकाने थाटली आहेत.या परिसरात सुरक्षिततेच्या अजून कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे दिसून येत आहे.यामुळे विके्रते,ग्राहक व परिसरातील लोकांचे जीव धोक्यात आला आहे.यात धक्कादायक बाब म्हणजे सोमवारी एका दुचाकीचालकाने आपल्या सोबत गॅस सिलेंडर सोबत घेऊन दुकाने परिसरात फेरफटका मारल्याचे दिसून आले.याबाबत जिल्हाधिका-यांचे पत्रकार संरक्षण समितीने तक्रार केली आहे.

ग़ुरूव्दारा बोर्डाच्या जागेत संबधित विभागाची परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र न घेता फटाक्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत.यामुळे कोणाच्या जीवीतास धोका झाल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करून संबधित फटाके विके्रत्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.दरम्यान मनपाने फटाके दुकानदारांना कोणाच्या दबावाखाली अथवा शिफारशीमुळे घाईने परवानगी दिली का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

तहसीलदारांकडून तपासणी
हिंगोली गेट येथील फटाके दुकान केंद्र व राज्य शासनाच्या नियमावलीनुसार आहेत काय यासह खबरदारीच्या सर्व उपाययोजना व मनपाकडील आवश्यक परवानगी आहे का या सर्व बाबींची तपासणी करण्यासाठी तहसीलदारांना पाठविण्यात आले आहे. त्यांच्याकडील तपासणी अहवाल काय येतो हे पाहूनच फटाके दुकानांना परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय होईल असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले.

मोहिते-पाटील गटातील त्या सदस्यांना दिलासा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या