25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeनांदेड४ महिन्यासाठी ४ कोटींचे नांदेडात कोव्हीड रुग्णालय

४ महिन्यासाठी ४ कोटींचे नांदेडात कोव्हीड रुग्णालय

एकमत ऑनलाईन

नांदेड : गतवर्षी नांदेड जिल्हा महाराष्ट्रात ग्रीनझोन म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आला होता. याचे सर्व श्रेय पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाला मिळाले होते. त्यानंतर मात्र नांदेडचा कोव्हीड रुग्णांचा आलेख वाढतच गेला. आजघडीला राज्यातील टॉपटेनमध्ये नांदेडचा समावेश झाल्यामुळे जिल्ह्याचे कप्तान तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी ही बाब मनावर घेत जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी डॉ. विपीन, डॉ. लहाने, डॉ. बिसेन, उपायुक्त अजितपालसिंघ संधू या चार शिलेदारांच्या सहका-याने नांदेड शहरातील कोव्हीड रुग्णांसाठी २00 खाटांचे ऑक्सिजन बेडची निर्मिती केली. केवळ चार महिन्यांसाठी चार कोटींचा खर्च येणार असला तरी नांदेडकरांच्या आरोग्यासाठी उचललेल्या पावलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गेल्या काही महिन्यापासून नांदेड शहरात कोव्हीड रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नव्हते. प्रथमोपचारासाठी अनेक स्वायस्थ संस्थेने जागा उपलब्ध करुन दिली तरी ऑक्सिजन बेडसाठी रुग्णांना मात्र दारोदार फिरावे लागत होते. हीबाब लक्षात घेवून जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाणांनी धाडसी निर्णय घेत नांदेडकरांसाठी २00 खाटांचे ऑक्सिजन बेड निर्मिती करण्यासाठी प्रयत्न केले.त्या प्रयत्नाला आज जवळपास यश आले असून ९५ खाटा अद्यावत तयार झाल्या आहेत. यासाठी रुग्णांना मोफत उपचार प्रशासनामार्फत केला जाणार आहे. नांदेड शहराला ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी पालकमंत्र्यांनी नुकताच ऑक्सिजनचा मोठा प्लॅन्ट बसविण्याची तयारी केली आहे. ऑक्सिजन विना कुठलाही रुग्ण दगावू नये यासाठी भक्ती लॉन्समध्ये शासनाचा पैसा खर्च करुन ४ कोटीचे भव्य कोव्हीड रुग्णालय निर्माण करण्यात आले आहे. अत्यंत सुसज्ज व स्वच्छ हॉस्पीटल प्रशासनामार्फत तयार करण्यात आले आहे. या हॉस्पीटलची पाहणी पालकमंत्र्यांनी गुरुवारी पाहणी केली असून शनिवार अथवा रविवारी या अद्यावत रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सुमीत मोरगेंचे अनुदान नव्हे.. हा तर शासनाचा पैसा
स्व. गणपतराव मोरगे यांच्यात दानत होती. गोरगरीबांच्या मदतीसाठी गणपतराव नेहमीच धावून गेले. आजही त्यांच्या नावाचा गवगवा संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात होत आहे. यात कुणाचेही दुमत नाही. परंतु शासनामार्फत भक्तीलॉन्समध्ये अद्यावत कोव्हीड रुग्णालय कोट्यावधी रुपये खर्च करुन निर्माण केले जात आहे. परंतु सुमीतच्या काही चाहत्यांनी सोशल मिडियावर हे सर्वकाही सुमित मोरगे करत असल्याचे दर्शविले आहे. यासंदर्भात खोलात गेले असता सुमीत मोरगे यांचे यामध्ये कुठलाही सहभाग नाही. केवळ जागा असली तरी ती देखील भाडेतत्वावर शासनाने घेतली आहे. त्यामुळे सुमीत मोगरेंचे अनुदान नव्हे तर हातर शासनचा पैसा असा खुलासा समोर आला आहे.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी चव्हाण तर उपाध्यक्षपदी भोसीकर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या