34 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home नांदेड कोव्हिड सर्व्हेक्षणात शिक्षकांनाच बनविले डॉक्टर

कोव्हिड सर्व्हेक्षणात शिक्षकांनाच बनविले डॉक्टर

एकमत ऑनलाईन

देगलूर: देगलूर शहरातील ५० वर्षा पुढे वय असणा-या लोकांचे कोव्हिड १९ सर्व्हेक्षण करण्याकरिता उपजिल्हाधिकारी देगलूर यांच्या आदेशाने ३१ शिक्षक आणि १२ आरोग्य कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली.

सदरील आदेशान्वये शिक्षकांनी दि. १० ते २८ जुलै २०२० पर्यंत शहरातील गल्लोगल्ली फिरून सर्व्हेक्षण कार्य पूर्ण करण्यात आले शिक्षकांचे सदरील काम पूर्ण झाल्यानंतरही परत डॉ. गवळकर यांनी शिक्षकांना परत शहरातिल सर्व नागरीकांचे सर्व्हेक्षण ,गरोदर माता यांचे सर्व्हेक्षण करण्याचे काम दि. २९ जुलैपासून लावण्यात आले यावेळी कोणत्याही आरोग्य कर्मचा-यांना सोबत देण्यात आलेले नाही .केवळ शिक्षकांना वेठबिगार समजून त्यांच्यावर काम लादण्यात आले .

हे शिक्षक या अगोदर देगलूर चेकपोस्ट नाका येथे १५ दिवस काम केले परत १८ दिवस पूर्ण देगलूर येथे उपजिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये ५० वर्षांवरील पूर्ण लोकांच्या घरोघरी फिरून सर्वेक्षण पूर्ण केले. याकामी पूर्वी नोडल अधिकारी म्हणून डॉ. उस्मान याची नियुक्ती करण्यात आलेली होती परंतु त्यानंतर डॉ. अभी गऊळकर यांची नियुक्ती नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली.

परंतू प्रत्यक्ष या ३१ शिक्षकांना ह्याचे काम पूर्ण झाले असून त्यांना परत काम लावण्यात येऊ नये काम केलेल्या शिक्षकांना आता होम कॉरंटाईन करण्यात यावे वयाचे ५५ पुर्ण केलेल्या कर्मचा-यांना ही सूट देण्यात यावी असे निवेदन काम केलेल्या सर्व शिक्षकांच्या वतिने उपजिल्हाधिकारी यांना तसेच वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आले . या निवेदनावर दौंडे डी . बी., बरडे आर. जी., मारवाड सी .एन., मुंगे व्ही .एन., शेख आय. आय., सुरनर व्ही .के., वडजे एन. एल., बोंडगे एस .एन., राठोड एस. बी. आदी शिक्षकांची या निवेदनावर स्वाक्ष-या आहेत.

Read More  करमाळयात २३ कोरोनाबाधीत रूग्ण आढळले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या