कुंडलवाडी : कुंडलवाडी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत सहाय्यक व्यवस्थापकाच्या खुर्चीवर बसून क्रेडिट कार्ड वाटण्याचा गोरख धंदा चालू असून यात बँकेच्या कर्मचा-यांचे आर्थिक हितसंबंध असल्याची शंका येत आहे. काही दिवसापूर्वी श्रीराम जन्मोत्सव समिती कुंडलवाडी चे अध्यक्ष मुकेश कुमार मोहनलाल जोशी ह्यांना बँकेकडून फोन आला ज्यात असे सांगण्यात आले की तुम्हाला क्रेडिट कार्ड मंजूर झाले आहे तुम्ही लवकरात लवकर बँकेत येऊन जावे. बँकेत गेल्यावर सहाय्यक व्यवस्थापक खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीने एक फॉर्म भरून घेतला व बँकेद्वारे सहाय्यक व्यवस्थापकाची खुर्ची त्या कर्मचा-्यास देऊन असे भासविले गेले की ती व्यक्ती बँकेचीच कर्मचारी आहे.
त्यामुळे ग्राहकांनी जास्त काही प्रश्न न विचारता ती व्यक्ती सांगेल तसे फॉर्मवर सह्या करून दिल्या यात त्यांनी आटो डेबीट फॉर्म भरून सुद्धा सही करून घेतली व ग्राहकास घरी जाण्यास सांगितले गेले व कार्ड घरपोच पोस्टाद्वारे पाठवण्याचे आश्वासन देण्यात आले.तिस-्याच दिवशी एक निनावी फोन आला त्यात असे सांगण्यात आले की तुम्ही च्या कार्डसाठी आवेदन दिले आहे त्या कार्डचे दुरुपयोग होण्याची शक्यता असून ते टाळण्यासाठी तुम्हाला ४०००० इन्शुरन्स काढावी लागेल. व ते इन्शुरन्स तुम्ही काढले नाही तर कार्ड देण्याची प्रोसेस पुढे सरकणार नाही.
तेव्हा आम्हाला कार्डची गरज नसल्याचे सांगण्यात आले. तरीही पोस्टाने कार्ड घरी आले तरी शंका आल्याने आल्याने ते कार्ड क्टिव्हेट न करता बँकेत जाऊन आलेल्या फोन कॉल विषयी व कार्डची गरज नसल्याचे सांगितले असता बँकेतील कर्मचा-यांनी क्रेडिट कार्ड कंपनी आणि आमच्या काही संबंध नसून तुम्ही प्रत्यक्ष कार्ड देणा-्या प्रतिनिधीशी बोला म्हणून मोबाईल नंबर देण्यात आला. सदर व्यक्तीस वारंवार फोन करूनही तो काही कार्ड बंद करत नाही व ई मेल ने रिक्वेस्ट पाठवली असता रिक्वेस्ट ब्लॉक असल्याचा रिप्लाय येत आहे आणि टोल फ्री नंबर वर कॉल करून बघितल्यास तिकडून कार्ड नंबर सब्मिट करण्यास सांगण्यात येत असून कार्ड नंबर सब्मिट केल्यास डाटा डजनॉट एक्झीट असे असे सांगण्यात येत आहे व पेड कॉल केल्यास कॉल डिस्कनेक्ट करण्यात येत आहे,
वारंवार बँकेत चकरा मारूनही व्यवस्थापक यांनी स्वत: प्रयत्न करूनही कार्ड बंद करता आलेले नाही व आतापर्यंत कार्ड क्टिव्हेट न करताही बँकेची अनिवल फीस ५८० रुपये याचा पहिला हप्ता तेराशे रुपये द्वारे डेबिट फॅसिलिटी द्वारे कापण्यात आले आहेत व अशाप्रकारे अनेकांना गंडविले असण्याची शक्यता आहे तरी संबंधित अधिका-याने गांभीयार्ने पाहून ग्राहकांचे झालेले नुकसान भरून द्यावे व सामान्य जनतेनेही ही क्रेडिट कार्ड साठी फोन आल्यास सावधान रहावे व कुणाची अशाप्रकारे फसवणूक करण्यात आली असल्यास आम्हाला संपर्क साधावा जेणेकरून सामूहिक लढा देण्यास बळ मिळेल