37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeनांदेडआठरा लाख अपहरण प्रकरणी ग्रामसेवकावर गुन्हा

आठरा लाख अपहरण प्रकरणी ग्रामसेवकावर गुन्हा

एकमत ऑनलाईन

नरसीफाटा : नायगाव तालुक्यातील गडगा ग्रामपंचायतीत २०१९ ते २०२० या कालावयीत चौदाव्या वित्त आयोगाच्या योजनेतर्गत १७ लाख ८७ हजार ३४३ रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी नायगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकार सुर्यकांत कांबळे यांनी दिलेल्या फियार्दीवरून ग्रामसेवक महम्मद रफी पठाण यांच्यावर शुक्रवारी नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. मागील चार वर्षात नायगाव पंचायत समिती या ना त्या कारणाने कायम चर्चेत राहत होती .गटविकास अधिकारी फाजेंवाड आल्यापासून काही प्रमाणात येथे शिस्त लागली होती .कर्मचारी प.स.मध्ये वेळेवर हजर राहु लागले .पण गडगा येथील प्रकरणाने प.स.पुन्हा चर्चेत आली .

गडगा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक महम्मद रफी पठाण यांनी चौदाव्या वित्त आयोगाच्या योजनेतर्गत १७ लाख ८७ हजार ३४३ रुपयांचा अपहार तर केला पण चौकशी करण्यासाठी गेलेल्या विस्तार अधिकार्यांना अभिलेखेही उपलब्ध करून दिले नाहीत असे असताना या प्रकरणी गटविकास अधिकार्यांनी ४ जानेवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार निलंबनाची कारवाई केले .त्याच वेळी गुन्हा दाखल करुन अपहार करण्यात आलेली रक्कम प्रचलीत नियमानुसार वसूल करायचे होते पण तसे झाले नाही.

गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड यांनी भ्रष्ट ग्रामसेवकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याने आमदार राजेश पवार यांनी हा प्रश्न थेट विधानसभेत उपस्थित केला होता. त्यामुळे पंचायतीतील विस्तार अधिकारी सुर्यकांत कांबळे यांनी नायगाव पोलीस ठाण्यात सदरील प्रकरणी लेखी दिलेल्या तक्रारारीवरुन पठाण यांच्या वर नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नायगाव तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून परिचित असलेल्या गडगा ग्रामपंचायतीमध्ये दि.१३ नोव्हेंबर २०१९ ते २३ नोव्हेंबर २०२० च्या दरम्यान आरोपी महंमद रफी पठाण यांनी चौदाव्या वित्त आयोग योजनेच्या अंतर्गत गडगा ग्रामपंचायतीच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नायगाव येथील खात्यातून १७ लाख ८७ हजार ३४३ रुपये वेगवेगळ्या लोकांचे बनावट नावे तयार करून व एजन्सी तयार करून उचलून घेतले. या प्रकरणी विस्तार अधिकारी सूर्यकांत कांबळे यांच्या फियार्दीवरून नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पठाण हे निलंबित झाल्यापासून कुठे आहेत यांचा थांग पत्ता प.स.च्या अधिका-यांना लागला तर नाहीच पण पठाण निलंबित झाल्यापासून त्या ठिकाणी दुस-यां ग्रामसेवकांची नेमणूक करण्यात आली त्या ग्रामसेवकांला पठाण यांनी अद्याप गडगा ग्रामपंचायतीचे रेकॉड उपलब्ध करूण दिले नाही .पठाण विरूध्द अपहाराचा कलम ४२०,४०९,४६७,४६८,४७१, भादवी प्रमाणे नायगाव पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास फौजदार बाचावार हे करीत आहेत.

मुलांचा अभ्यास आणि पालकांची कसरत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या