16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeनांदेडतत्कालीन अपर आयुक्त गगराणींसह कुटुंबीयांवर नांदेड येथे गुन्हा

तत्कालीन अपर आयुक्त गगराणींसह कुटुंबीयांवर नांदेड येथे गुन्हा

एकमत ऑनलाईन

नांदेड : नांदेड-वाघाळा महापालिकेचे तत्कालीन अपर आयुक्त रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांनी गुन्हा दाखल केला आहे.

गगराणी हे सध्या सेवानिवृत्त आहेत. त्यांची येथील शारदानगर भागातील मालमत्तांची चौकशी करण्यात आली. या चौकशीत शासकीय सेवेतील १ मार्च २०१० ते ३० जून २०१६ या लोकसेवक पद धारण केलेल्या कालावधीतील मालमत्ता कायदेशीररित्या प्राप्त आर्थिक उत्पन्नाच्या तुलनेत अधिक असल्याबाबतचे स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. त्यांनी ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत २८ लाख ७२ हजार ६६० रुपये म्हणजेच ४५ टक्के अधिक मालमत्ता संपादित केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही मालमत्ता त्यांच्या पत्नी जयश्री रामनारायण गगराणी यांच्या नावावर असून, त्यांचे चिरंजीव प्रथमेश रामनारायण गगराणी यांनी ही मालमत्ता ताब्यात ेवून त्यावर व्यवसायास प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे गगराणी यांच्या कुटुंबीयांवर हा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी (तत्कालीन अपर आयुक्त), जयश्री रामनारायण गगराणी (गृहिणी, बुटिक व्यवसाय) आणि प्रथमेश रामनारायण गगराणी (व्यवसाय व्यापार) यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलिस स्टेशन नांदेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या