निवघा: परिसरात जून महीण्याच्या शेवटी दमदार पाऊस झाल्याने शेतक-यांनी सोयाबिन पेरणीला सुरुवात केली.कृषी सेवा केंद्रावर एकच गर्दी झाली.सोयाबिन बॅगचीकिंमत ३८०० रू. पासुन ते ४३०० रु. पर्यत बाजारात अनेक कंपनीचे सोयाबीन बियाणे उपलब्द होते.
त्या मध्ये निवघा बाजार पेठेत सरासरी सोयाबिन बॅग ३०किलो.२७की.व २५ कि. अशा सोयाबिन बॅगा ४०००रु. ते ४३००रु. भावा प्रमाणे शेतक- यांनी खरेदी केल्या.त्या सोबत बिजप्रक्रिया करण्यासाठी विषेश कंपनीचे बुरशीनाशक, किटकनाशक,खते खरेदी करून आपल्या जवळील बियाणे व खत यासाठी ठेवलेला पैसा गुंतवून पेरणी केली.जमिनीत ओल भरपुर असताना परिसरातील अनेक शेतक-यांचे बियाने उगवलेच नाही.
काही शेतक-यांनी एकाच दिवशी वेगवेगळ्या कंपनीच्या सोयाबिन बॅग एकाला एक लागुन असलेल्या शेतात पेरणी केली असता काही कंपनी च्या बॅग उगवल्या व काही कंपनी चे सोयाबीन बियाने उगवलेल नाही. त्यामुळे निवघा बाजार पेठेत बोगस बियाने दाखल झाले होते असे सिध्द होते असे येथील शेतक-यांचे म्हणने आहे.एकरी शेतक-यांचा सरासरी खर्च याप्रमाणे झाला. एकरी सोयाबिन खर्च.
सोयाबिन१ बॅग १-४०००रु , खत१ पोते१-१५००रु,बिजप्रक्रिया औषध -२००रु,जमीन रोटर करणे – ८००रु, जमीन वखरनी – ६००रु, सोयाबिन पेरणी – ८००रु यामध्ये रोजदारी,भाडे, हमाली असा एकरी ८०००ते ८५०० रू च्या जवळपास येथील शेतक-यांचा खर्च झाला असून येवढा खर्च करुन बियाने उगवले नसल्याने परिसरातील अनेक शेतक-यावर दुबार पेरणीचे संकट आले असून,दुबार पेरणीमुळे परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
निवघा बाजार पेठेत बोगस बियाणे विक्री झाल्याने शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट आल्याचे शेतक-यांमधुन बोलल्या जात आहे.कृषी विभागाकडून याकडे जानिवपुर्वक दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे दिसत आहे.