21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट

नांदेड जिल्ह्यात शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट

एकमत ऑनलाईन

नांदेड : मृग नक्षत्राच्या सुरुवातील पावसाने जोरदार हजेरी दिल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात खरिपाची पेरणी १५ जून पर्यंत पुर्ण झाली. गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यातील काही भागात पावसाने दडी दिल्यामुळे पेरलेला मोड उगवला नाही. तर काही ठिकाणी उगवन झाल्यानंतर उन्हाच्या तिर्वतेमुळे पिक वाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शतक-यावर दुबारा पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.

शेतक‍-यांना दुबार पेरणीचे संकट
वाई बाजार : पेरणी झालेल्या पिकाला पावसाची गरज असतांना पावसाने उघाड दिली आहे. त्यामुळे पावसाची प्रतिक्षा शेतक-यांना आहे. माहुर तालुक्यात आठ दिवसापासून पाऊस नसल्याने काही ठिकाणी बियाणे निघाले नाही तर पावसाअभावी पिकाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे कवळ्या अंकुरांना पावसाची नितांत गरज आहे.माहुर तालुक्यात खरीपाची पेरणी जवळपास आटोपली आहे. अनेकांनी पावसाला सुरूवात होताच पेरणीस सुरूवात केली तर काहींनी उशाराने पेरण्या केल्या आधी पेरण्या केलेल्या शेतक-यांचे पिक डवरणीला लागले आहे. परंतु ज्यांनी उशीराने

पेरणी केली त्या शेतक-यांच्या पिकाला धोका पोहचत आहे. कारण पेरणीनंतर आठ दिवस होऊनही पाऊस नसल्याने अश्या ठिकाणी एक तर बियाणे निघाले नाही तर दुसरीकडे अश्या पिकांची वाढ खुंटली असून या पिकांना तातडीने पावसाची गरज आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. पावसाची शेतक-यांना निंतात गरज असतांना पाऊस नसल्याने शेतक-्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

खरीप हंगामाची सुरूवात पावसाने चांगली केली व त्यात शेतक-यांनीही घाईगडबडीने पेरण्या आटोपत्या घेतल्या झालेल्या पावसाने काही टक्के सोडल्यातर इतर पेरण्या साधल्या गेल्या आहे. महाग भावाने बियाणे व खताची जुळवा जुळव करुन शेतक-यांनी होते नव्हते ते शेतात नेऊन टाकले आहे. त्यामुळे आता शेतक-यांची सर्व दारोमदार ही निसर्गावर व पावसावर अवलंबून आहे. त्यात काही दिवसापासून पाऊसही ज्या भागात झाला. त्या भागातील पिके चांगली आहे. परंतु पेरणीनंतरही काही भागात पाऊस झाला नसल्याने अश्या भागात पावसाची नितांत गरज आहे. परंतु पावसाने दडी मारल्याने मात्र शेतक-्यांची चिंता वाढली असून शेतक-यांना पावसाची प्रतिक्षा आहे.

हदगाव तालुक्यात पावसाने फिरवली पाठ
यावर्षी मृग नक्षत्रात पावसानी दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला होता समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्व शेतक-्यांनी पेरण्या करून आनंदाच्या वातावरणात असताना आज आठ दिवसापासून पाऊस गायब झाल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.शेतक-यांनी आपल्या शेतात महागड्या कंपन्यांचे बी- बियाणे – खते टाकून पेरण्या केल्या परंतु आठ दिवसापासून पावसाने तालुक्याकडे पाठ फिरवली असल्याने आता शेतक-यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत

तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहेत नोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकांची पेरणी केली आहे सोयाबीन पिकांना पेरणी केल्याच्या नंतर म्हणजे दुस-्या दिवशी तरी पाणी आवश्यक असते तर त्यांची उगवण चांगली होत असते परंतु आठ दिवस झाले पेरणी करून सुद्धा पाणी नसल्याने दूबारा पेरणीचे संकट उभे राहण्याची तालुक्यात दाट आहे शक्यता .अगोदरच तालुक्यात बी- बियाणे – खते यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने मोठ्या शिताफीने बी – बियाणे – खते मिळाली होती पेरणी करून पाऊस नसल्याने तीपण परतण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.शेतक-्यांवर पीक कर्ज.विमा.चौहू बाजूने संकट असताना आता दूबारा पेरणीचे संकट उभे राहते की काय असे त्यांना वाटत आहे तालुक्यातील काही शेतक-्यांचे बियाणे परतले आहे तर काही शेतक-यांचे उगवण झालेली पिके कोमेजून जात आहेत.

तर काही सोयाबीनच्या बियांना उख-्या खात आहे अशा प्रकारे मिळालेल्या महागमौल्यवान बी- बियाणे- खताची दयनीय अवस्था झाली आहे.बाजारात सोयाबीनचा तुटवडा जास्त प्रमाणात असल्याने तालुक्यातील शेतक-्यांनी घरच्या घरी बनविलेल्या सोयाबीनच्या बियानाकडे कल केला आहे.परंतु आता दूबारा पेरणीचे संकट जर ओढले तर बाजारात अश्या प्रकारचा तुटवडा घरचे पण बियाणे संपली आहे आता काय करावे असा मोठा प्रश्न शेतक-यांच्या वर पडलेला आहे असेच जर पावसाने दांडी मारली तर तालुक्यातील सर्व शेतक-्यांना दूबारा पेरणीचे संकट ओढल्या शिवाय राहणार नाही अशी चर्चा शेतकरी वगार्तून होत आहे.

जगाचा पोशिंदा बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत
डोंगराळ, माळरानावरील कोरडवाहूबहुल क्षेत्र असलेल्या कंधार तालुक्यातील शेतकरी मान्सूनपूर्व पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यानंतर मान्सून ही दमदार कोसळला त्यामुळे बहुतांश शेतक-यांनी पेरणी आणि लागवडीची कामे उरकून घेतली सध्या मात्र पावसाने ओढ दिल्याने शेत शिवारात दिमाखदारपणे डोलणा-या पिकांना पाण्याची नितांत गरज भासत आहे त्यामुळे शेतक-यांची चिंता वाढली आहे.

तालुक्यात जूनच्या पहिल्याच आठवड्यातच समाधानकारक पावसाने हजेरी लावली त्यामुळे परिसरातील बागायती कापूस पिकास हा कोरडवाहू जमिनीतील पिकांची शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची कामे आटोपती घेतली यासाठी शेतक-्यांनी आर्थिक संकटाच्या काळातही उसनवारी करत कर्ज काढून सोनेतारण करुन हजारो रुपये खर्च केले सध्या ही पिके शेतात पावसा अभावी वाढू लागली आहेत मात्र यातील आठवडाभरापासून पावसाने दांडी मारली आहे.

ज्या शेतक-यांना पाण्याची व्यवस्था आहे असे शेतकरी पिकांना पाणीही देत आहेत तरीही उन्हाने आणि जोरदार वाहणा-या वा-यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. या पाण्यामुळे हे पीक फक्त हिरवे दिसते मात्र त्याची जोमाने वाढ होऊन विक्रमी उत्पन्न मिळवण्यासाठी पिकाच्या या अवस्थेत पावसाची नितांत गरज असल्याचे मत जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत.

चिंचणी गाव झाडामुळे बनले ऑक्सीजन पार्क

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या