22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeनांदेडशेतक-यावर अवकाळी पावसाचे संकट

शेतक-यावर अवकाळी पावसाचे संकट

एकमत ऑनलाईन

किनवट : किनवट तालुक्यात २ मे पासून सुरु असलेला अवकाळी पाऊस दररोजच वेगवेगळ्या भागात वादळी वारा विजेच्या कडकडाटासह पडत असल्याने शेतातील पिंकाचे , झाडावरील आंब्याचे व ग्रमीण भागातील घरावरील पत्रे उडून जाऊन नुकसान झालेल्या घराचे पंचनामे करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसान ग्रस्ता कडून होत आहे.

दिनांक २ , ५ , ६ मे च्या सायंकाळी सात ते नऊच्या दरम्यान वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह पाऊस होऊन तालुक्यातील दिगडी मंगावाडी, मांडवा, नागझरी, झेंडेगुडा परिसरातील शेतातील तोंडाला आलेली पांढरी शुभ्र ज्वारी व तीळ पडून सवान झाले . मूग, भुईमूग , व आंब्याची झाडे मोडून व आंबे पडून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले . ग्रामिण भागातील पत्राचे ( टिन ) चे असलेल्या घरावरील पत्रे उडून गेल्याने पुर्ण संसार उपयोगी वस्तू , कपडे, धान्य भिजून मोठे नुकसान झाले आहे.

आता ग्रामीण भागातील शेतक-यावर कोरोना सोबत आता अवकाळी पावसाच्या संकटाचे भूत मानगुटीवर बसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे . असून शासनाने त्वरित पंचनामे करून शासनाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी व्‍यंकटी जायभाये, अरविंद घुगे,दत्ता केंद्रे यांच्या सह अनेक शेतक-यांकडून होत आहे.

अकोला येथे 250 खाटांचे कोविड रुग्णालय तातडीने सुरू करा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या