21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeनांदेडबाभळीच्या बॅक वॉटरमुळे पिकांचे नुकसान;आठ वर्षापासून मावेजा मिळेना

बाभळीच्या बॅक वॉटरमुळे पिकांचे नुकसान;आठ वर्षापासून मावेजा मिळेना

एकमत ऑनलाईन

धमार्बाद : बाभळी बंधा-याच्या बॅकवॉटरमुळे परीसरातील अनेक गावातील शेतक-यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले परंतू आठ वर्ष उलटूनही शासनाने पिकांचा मावेजा दिला नाही. नुकसानग्रस्त शेतक-यांना मावेजा द्यावा अन्यथा आंदोलन करण्यात यईल अशा इशारा निवेदनाव्दारे छावा संघटनेने प्रशासनास दिला आहे.

बाभळी येथे शासनानी २२५ कोटी रुपय खर्च करून बाभळी बंधारा बांधला आहे.परंतु त्याचा फायदा शेतक-यांना झालाच नाही.उलट बंधा-याच्या बॅकवॉटरमुळे तालुक्यातील मोकली,रत्नाळी,बाभळी,शेळगाव (ध),माष्टी,पाटोदा (खु)पाटोदा (बु),पाटोदा (थडी)जारीकोट,चोंडी,दिग्रस,चोळाखा,अटाळा व नदीकाठच्या इतर गावांतील ३०० हेक्टर शेती बाधित झाली आहे. यासाठी सन २०१२ मध्ये शासनाकडून भुसंपादन व पाटबंधारे विभागाकडून नदीकाठच्या शेतीचे सर्वे करण्यात आले होते.

परंतु सर्वे होऊन आठ वर्ष उलटले आहेत.परंतु नुकसानग्रस्त शेतक-यांना आजपर्यंत मावेजा मिळाला नाही.परंतु शेतक-यांच्या पिकांचे नुकसान होत राहिले, सदरील प्ररकरणाची दखल संबंधित विभागाने घेत नसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील चोळाखेकर यांनी शेतक-यांना तात्काळ नुकसान झालेल्या पिकांचे मावेजा देण्यात यावा,अनथा संघटनेकडून आंदोलन करण्याचा लेखी इशारा येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांना दिला आहे.

सदरील निवेदनावर छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील चोळाखेकर, सजेर्राव पाटील बाभळीकर, रोहिदास पाटील कारेगावकर, सोपान पाटील धानोरकर, दिंगबर पाटील चोंडीकर,ईरेश पाटील चिकनेकर,शिवाजी पाटील, आकाश पाटील ढगे, तिरूपती पाटील अटाळेकर यांच्या स्वाक्ष-या आहेत.

स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या अस्थिकलशाचे चंद्रभागेत विसर्जन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या