23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeनांदेडहणेगाव परिसरातील पिकांची आ. अंतापूरकर यांच्याकडून पाहणी

हणेगाव परिसरातील पिकांची आ. अंतापूरकर यांच्याकडून पाहणी

एकमत ऑनलाईन

नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करण्याच्या दिल्या सुचना
हाणेगाव: देगलूर तालुक्यातील हणेगाव परिसरातील सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. याची दखल घेत आ. रावसाहेब अंतापुरकर यांनी हणेगाव भागातील नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी केली.

हणेगाव , खुतमापुर , चव्हान वाडी , लोणी ,या भागात अतिवृष्टी झाल्याने नाले पुर्ण पणे भरून वाहू लागले होते, एवढा मोठा पाऊस होता की, हणेगाव येथे अनेक ठिकाणी नाले फुटल्याने शेतात पाणी शिरून शेती पिकांची मोठे नुकसान झाले आहे. याची माहिती मिळताच आमदार अंतापुरकर यांनी आज मंगळवारी सकाळी हणेगाव येथे भेट देऊन शेती पिकांची पाहणी केली. हणेगाव येथील शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले या ठिकाणी सोयाबीन व उडीद, कापूस हि शेतातील पिके पाण्यासह वाहून गेले आहेत. या अगोदर शेतकरी दुबार तिबार पेरणी करुन डबघाईला आला होता आणि काल झालेल्या ढगफुटी पाण्यामुळे अनेकाचे पिके वाहून गेल्या मुळे शेतकरी हा पुर्ण पणे संकटात सापडला आहे यावेळी अंतापुरकर यांनी पिकांची पाहणी केली ‌.

यावेळी तहसीलदार अरविंद बोळंगे , कृषी अधिकारी शिंदे,जि.प. सदस्य दिलीप बंदखडके , सभापती .प.स संजय वलकल्ले , माजी सभापती.कृ.उ.बा विवेक पडकंटवार , (तालुका कॉंग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. प्रितम देशमुख , वसंत आडेकर , ग्रामविकास अधिकारी बि.जी . उमाटे , हणेगाव तलाठी कोंडलवाड , कृषी कर्मचारी धनासुरे , व अनेक शेतकरी बांधव उपस्थिती होते.

Read More  पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या