Tuesday, October 3, 2023

हदगावात कृषि सेवा केंद्रावर गर्दी : कोरोनाचे नियम धाब्यावर

हदगाव : संचारबंदीत कृषी सेवा केंद्रांना सकाळच्या वेळी सुट देण्यात आली आहे़ मात्र याचा काही जण गैरफायदा घेत दुकानांवर गर्दी जमवित कोरोनाचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत.

जिल्ह्यात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आह़े कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीर्चे प्रयत्न करण्यात येत आहेत़आता २३ जुलै पर्यत जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. शेतक-यांच्यासाठी अत्यावश्यक बाब म्हणून कृषी सेवा केंद्राना ७ ते २ पर्यत मर्यादित वेळेचीअट घालून दिली सर्वनियमाचे पालन करत कृषी विक्रेत्यांनी शेती विषयक कीटकनाशके औषधी खते विक्रीसाठी मुभा दिली आहे.

परंतु हदगाव येथील गजानन कृषी सेवा केंद्र जिल्हा अधिकारी यांनी दिलेले कोरोना विषाणू रोगांचे नियम धाब्यावर बसवून शेतीविषयक खते कीटकनाशके औषधे विक्री करीत आहेत.तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे तीन रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असुन ग्रामीण भागातही कोरोनाने पाय पसरले असून बहुतांश ग्रामीण भागातील शेतकरी कीटकनाशके औषध खते शेतीविषयक साहित्य खरेदी करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी येतात परंतु कृषी केंद्रामध्ये कुठल्याही प्रकारची नियम व सुरक्षा नसल्याने विक्रेत्यांच्या बेफिकीर वागण्यामुळे कोरोना विषाणूचा धोका वाढला आहे.

गेल्या आठवड्यात तहसीलदार जीवराज दापकर .उपविभागीय अधिकारी महेश वडदकर व त्यांच्या पथकाने तामसा येथे कोरोना विषाणूचे नियम तोडलेल्या कृषी सेवा केंद्राना सील करून दंडही वसुल केला परंतु हदगाव येथील गजानन कृषी सेवा केंद्राने नियम तोडून सुद्धा त्यांच्या पाठीमागे राजकीय पाठबळ असल्यामुळेच त्यांच्याकडून दंड वसूल केला जात नसल्याचे जनतेतून बोलल्या जात आहे.

Read More  गंगाखेड कोरोना विलगीकरण कक्षामध्ये सोयी सुविधाचा अभाव

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या