26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeनांदेडइस्लापुर जि.प.गटात इच्छुकांची गर्दी; राजकीय मंडळींचा भेटीगाठीवर भर

इस्लापुर जि.प.गटात इच्छुकांची गर्दी; राजकीय मंडळींचा भेटीगाठीवर भर

एकमत ऑनलाईन

शिवणी : प्रतिनिधी
आगामी जि.प. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून किनवट तालुक्यातील इस्लापुर, जलधारा जिल्हा परिषद गटात अनेक राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले असून, मतदार संघातील इच्छुकांनी भेटीगाठीवर भर दिला आहे. तर अनेक उमेदवार आतापासून निवडणूक लढविण्यासाठी गुडग्याला बाशिंग बांधून तयार होऊन बसले आहेत. त्या अनुषंगाने विविध पक्षाच्या पक्ष श्रेष्टींनी योग्य उमेदवाराच्या चाचपण्या करण्यास सुरूवात केली आहेÞ तर माजी आÞ प्रदीप नाईक यांचे पुत्र कपिल नाईकांच्या एंट्रीने इस्लापुर गटात आणखी रंगत पाहला मिळणार आहे. मागील अनेक महिन्यापासून राजकीय मंडळींच्या चर्चेतला असलेला विषय म्हणजे राज्यातील मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणा-या स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक या संबधी दरम्यानच्या काळात मागील दोन ते अडीच वर्षांपासून कोरोना महामारीने डोके वर काढल्याने होते. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण विना निवडणूका होऊ नये असे सरकार व विरोधी पक्षाचे म्हणणे होते.

यामुळे बहुतांशी निवडणुका रद्द करण्यात आल्या होत्या. आता कोरोना महामारीची थोडीशी उसंत मिळाली व ओबीसी आरक्षणासाठी निवडणूक थांबवता येणार नाही असे म्हणत काल झालेल्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राज्यात जिथे पाऊस कमी असतो तिथे निवडणूक आयोगाने वेळेत निवडणुका घ्यावे असे राज्य सरकारला फटकारल्याने आता मराठवाडयातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूकीचे तारीख लवकरच जाहीर करण्याचे संकेत आहेÞ या दरम्यान निवडणूक येत्या अंदाजे दोन महिन्यांच्या मागे- पुढे बिगुल वाजणार असल्याची शक्यता उराशी बाळगून किनवट तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली असे दिसून येते. त्या अनुषंगाने विविध पक्षाच्या पक्ष श्रेष्टी कडून योग्य उमेदवाराची चाचपणी सुरू आहेÞ तर विविध पक्षातील अनेक उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी गुडग्याला बाशिंग बांधून तयार होऊन बसले आहेत.
किनवट तालुक्यातील इस्लापुर जि.प.गटातिल इच्छुक उमेदवार सामाजिक, धार्मिक, कौटूंबिक कार्यक्रमात मुद्दाम हजेरी लावून मतदारांशी जवळीकता साधत आहेत. त्यासाठी कोणत्याही कार्यक्रमात इच्छुकांची मांदियाळी दिसून येत आहे.

माजी आमदार प्रदीप नाईक मागील विधानसभेच्या निवडणुकीत थोडक्यात सत्ता हातातून निसटल्यानंतरही राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्यांचे चाहते यांच्या सोबत फोनवरून सतत संपर्कात आहेतÞ सध्या स्वत: माजी आÞ प्रदीप नाईक व त्यांचे चिरंजीव कपिल नाईक हे मागील काही महिन्यांपासून इस्लापुर जिल्हा परिषद गटात विविध समारंभ व कार्यक्रमात वेळोवेळी हजेरी लावताना दिसून येत आहे. तर सतत होत असलेल्या दौ-याकडे पाहता जि.प.गटातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नवचैतन्य व उत्साह निर्माण झाल्यासारखे चित्र दिसून येत आहे.

तर दुसरीकडे आगामी जि.प.निवडणुकीत माजी आमदार प्रदीप नाईकांचे चिरंजीव इस्लापुर जि.प.गटात निवडणुकीच्या ंिरगनात उतरवतील असे दिसून येत असल्याचे सर्वत्र चर्चा होत आहे. युवा नेते इस्लापुर जि.प.गटात कपिल नाईक यांनी निवडणूक लढवावी असे मत राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या चाहत्यांकडून होत आहे. आता आरक्षण सोडत व निवडणुकीच्या तारखा ऐकण्याकडे विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष्य लागले आहे. तर पुढील काळात इस्लापुर गटात जि.प.निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजपा, माकपा असे तिरंगी लढतीची निवडणूक पहावयास मिळेल तर सद्य परिस्थितीत कांग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम पक्षामध्ये निरव शांतता असल्या सारखे दिसून येत आहे.असे मत राजकीय विश्लेशकांकडून बोलले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या