30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeनांदेडकुंडलवाडी शहरातील मुख्य बाजारसह अनेक प्रभागात वर्दळ

कुंडलवाडी शहरातील मुख्य बाजारसह अनेक प्रभागात वर्दळ

एकमत ऑनलाईन

कुंडलवाडी : शहरात नगर परिषद प्रशासन,आरोग्य प्रशासन,पोलीस प्रशासन आदींचा वतीने वारंवार नागरिकांना आवाहन करुनही शहरातील मुख्य बाजारासह अनेक वस्त्यांमध्ये वर्दळ आढळून येत आहे.काही व्यापारी मंडळी शटर बंद उद्योग चालु या अनुषंगाने व्यवसाय करीत असल्याचे चित्र दिसायला मिळत आहेत.तसेच गल्ली बोलीतील किराणा दुकाने चालूच, शहरात आठवड्यातून दोन वेळा भरणारा बाजार आता मुख्य बाजारपेठ न भरता लोकवस्ती असलेल्या ठिकाणी भरत असल्याचे चित्र दिसायला मिळत आहे.बाजार भरण्यासाठी या व्यापा-यांना समती कोण देत आहे ? असा सवाल सुज्ञ नागरीक उपस्थित करीत आहे.यामुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी संबंधीत अधिकारी व व्यापारी नागरिकांनी शासनाचा लॉकडाऊन, संचार बंदी आदीनियमाचे पालन करीत स्वताचा व ईतरांचा जिवाशी खेळण्याचे जोखीम पत्करून नय असे आवाहन सुज्ञ नागरीकातर्फे करण्यात येत आहे.

नगर परिषद प्रशासन,आरोग्य प्रशासन,पोलीस प्रशासन आदींचा वतीने रस्त्यावर उतरुन नागरिकांना लॉकडाऊन नियमाचे पालन करीत शासनाने व्यवसाय चालू ठेवण्यासाठी दिलेल्या वेळात व्यवसाय करून लॉकडाऊन, संचार बंदी आदीनियमाचे पालन करावे असे आवाहन करीत आहे. परंतु याचा कुठलाच फरक याठिकाणी दिसून येत नसल्यामुळे कुंडलवाडी करांसाठी एकच पर्याय कडक लॉकडाऊन आता उरला आहे.नागरीकांनी त्रिसुत्री नियमांचा अवलंब करा , मास्क वापर करा , हात धुणे , सोशल डिस्टसिंग ठेवण्यासंदर्भात वारंवार सांगण्यात येत असताना शहरातील काही नागरीक गाफिल राहत आहेत.त्यामुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.शहरात दि.२२ एप्रिल रोजी ७ कोरपना पॉझिटिव्ह रूग्ण अढाळल्यांची माहीती मिळाली तसेच परिसरातील प्रत्येक गावात एखादा तरी कोरोनाबाधीत रुग्ण सापडत आहे.

यासाठी आरोग्य प्रशासन गांभियार्ने काम करीत असून.शहर व परीसरात आरटीपीसीची तपासणी करण्यात येत आहे.अनेकांची अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात येत आहे. अ‍ॅन्टीजेन टेस्टचा निकाल उशिरा येत असल्यामुळे बाधीतांच्या संख्येत वाढ होत आहे .प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात लसीकरण अभियान कार्यरत असून परंतू एका विशिष्ट समाजाचे लसीकरणास मनावेतसे सहकार्य लाभत नाही असे वैद्यकीय अधिकारी बोलून दाखवत आहे.यावर देखील कोणाचे अंकुश नसल्याचे दिसुन येत आहे.शहरातील पोलिस कुठल्याही प्रकारची कडक कारवाई करण्यास तैयार नाहीत.सध्या असलेले लॉकडाऊन हे असून नसल्यासारखे असल्यामुळे पोलिसांनी देखील कडक पाऊले उचलेली नसल्यामुळे अनेक नागरिक संचारबंदीची पायमल्ली करतांना दिसून येत आहेत.यामध्ये राजकीय पुढारी देखील पुढाकार घेवून जनजागृती करताना दिसत नाही.असे नागरीक बोलून दाखवत आहे.

तसेच प्रशासनाचा वतीने आठवडी बाजारात बाजार भरू देत नसल्याने व्यापारी बाजार लोकवस्तीत भरत असल्याने सोशल डिस्टसिंचा फज्जा उडाल्याचे दृश्य पहावयास मिळत आहे .कुंडलवाडीकरांसाठी आता कडक लॉकडाऊन हा एकच पर्याय समोर येत आहे . कड़क लॉक डाऊन झाले नाही तर ब्रेक द चेन होणे अवघड दिसत आहे.अशीच शहरातील परिस्थितीत राहील्यास आपल्या डोळ्यांनीच आपल्या नातेवाईकांचा मृत्यू पाहण्याची वेळ लवकरच येण्याची शक्यता नाकरता येत नाही असे सुज्ञ मंडळी बोलून दाखवत आहे. तरी सबंधीतानी शहरातील मुख्य बाजारसह अनेक प्रभागातील वर्दळी थांबवून लोक वस्तीत भरणा-या आठवडी बाजारास ब्रेक लावा अशी मागणी होत आहे.

सीरमच्या लसीबाबतचे ते वृत्त चुकीचे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या