22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeनांदेडकापसाच्या आड गांजाची लागवड

कापसाच्या आड गांजाची लागवड

एकमत ऑनलाईन

नांदेड : कापसाच्या आड गांजाची लागवड करणा-या बिलोली तालुक्यातील कांगठी येथील शेतक-यांस पकडून गांजाची २१ किलो वजनाचे झाडे असा एकूण ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

बिलोली तालुक्यातील कांगठी येथील शेतकरी व्यंकट गंगाधर नरवाडे यांनी आपल्या उतरेस जवळपास २३ किमी अंतरावरील गट क्रमांक ३०४ मधील शेतात गांजाची झाडे लावली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळाली. या अनुषंगाने पोलीस उपनिरिक्षक आशिष बोराटे, पोलीस अंमलदार गुंडेराव कर्ले, मारोती तेलंगे, दशरथ जांभळीकर, बालाजी तेलंग, गणेश धुमाळ, पवार आणि केंद्रे या पथकास कारवाईसाठी पाठविले.सोबत रामतिर्थ सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय जाधव यांची भेट घेवून पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक असलेले सर्व कागदपत्र तयार करून घेतले.

त्यानंतर बिलोलीचे पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांना या छाप्यात राजपत्रीत अधिकारी या नात्याने उपस्थित राहण्यासाठी विनंती केली. अंमली पदार्थांवर कार्यवाही करतांना आवश्यक असलेले सर्व काम पोलीस अंमलदार बोडके, लिंबाळे, आदींनी पुर्ण केले.पोनि शिवाजी डोईफोडे यांना सोबत घेवून पोलीस पथकाने शेत गट क्रमांक ३०४ येथे धाड घातली.यावेळी कापसाच्या पिकाची तपासणी केली असता एकूण १७ गांजाची झाडे या शेतात सापडली. त्यांचे एकूण वजन २१ किलो ५५० ग्रॅम आहे. या गांजाची किंमत ८६ हजार २०० रुपये आहे.

कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून आशिष बोराटे यांनी रामतिर्थ पोलीस ठाण्यात अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यातील कलम २० (अ)(ब) नुसार व्यंकट गंगाधर नरवाडे ३८ याच्याविरुध्द तक्रार दिली. या तक्रारीनुसार रामतिर्थ पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रामतिर्थ सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी गांजाच्या लागवडीची आपल्या सुत्रांकडून माहिती काढून गांजा पकडणा-या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या