21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeनांदेडठिबक सिंचनाचा वापर करून हळद लागवड

ठिबक सिंचनाचा वापर करून हळद लागवड

एकमत ऑनलाईन

अर्धापूर : मृग नक्षत्र येण्या अगोदरच अधार्पूर तालुक्यात हळद लागवडीला सुरुवात झाली आहे. यंदा इसापूर आणि येलदरी धरणात मुबलक पाणीसाठा असल्यामुळे विहीर व बोअरमधील पाणीपातळी टिकून आहे. त्यामुळे ठिबक सिंचनाचा वापर करून मान्सून येण्यापूर्वीच शेतक-्यांनी हळद लागवडीला सुरुवात केली आहे. येथील बागायतदार शेतकरी उस पिकाला पर्याय म्हणून हळद पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करीत आहेत.

अर्धापूर तालुक्यातील शेती ही अतिशय सुपीक जमीन शंभर टक्के सिंचनाखाली आहे. म्हणून गेल्या काही वर्षात हळदीच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली असून शेतक-यांनी ऊसाला पर्याय आणि नगदी पीक म्हणून हळद लागवडीला पसंती दिली आहे. यंदा अर्धापूर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात पंचवीस हजार हेक्टरच्या वर हळद पीकाची लागवड होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हळद हे बागायती पीक असून ते नऊ महिन्यात येणारे पीक आहे. पावसाळ्याच्या आगमनानुसार साधारणत: जून ते जुलै दरम्यान हळदीची लागवड केली जाते. पण यावर्षी येलदरी आणि इसापूर धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे जमिनीची पाणीपातळी खोल न जाता विहीर व बोअरमधील पाणी पातळी टिकून आहे. तसेच लॉकडाऊनमुळे शेतीत काम करणा-या मजुरांची उपलब्धता आणि शेतक-्यांना मिळणारा पूर्णवेळ यामुळे खरीप हंगामापूर्वीच हळद लागवडीसाठी शेत शिवारे सज्ज झाली आहेत.

मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला आणि आगामी काळात सुध्दा मुबलक पर्जन्यमान असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे यंदा ज्या शेतक-्यांकडे विहीर व बोअरमध्ये पाणी उपलब्ध आहे. अशा शेतक-यांनी हळद लागवडीला सुरुवात केली आहे. गतवर्षी अधार्पूर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात वीस हजार हेक्टरवर हळदीची लागवड करण्यात आली होती. यंदा चांगल्या पावसाची शक्यता आणि धरणामधील मुबलक पाणीसाठा यामुळे हळदीच्या क्षेत्रामध्ये वाढ होऊन पंचवीस हजार हेक्टरवर लागवड केली जाईल, असा अंदाज कृषी विभागाकडून सांगण्यात आला आहे.

इंडियन घोस्ट ट्री ‘कांडोळ’

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या