देगलूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजर्षी शाहू प्राथमिक विद्यालय देगलूर येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले शंकरराव इंगळे सचिव श्री संत तुकाराम महाराज शिक्षण प्रसारक मंडळ देगलूर कार्यक्रमाचे उद्घाटक आ. जितेशराव अंतापुरकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एम बी शेख केंद्रप्रमुख नांदेड, प्रशांत पाटील आचेगावकर, जनार्दन बिरादार, बालाजी पाटील थडके ,ज्ञानेश्वर पाटील, ढगे सर, संजय जोशी तसेच इतर मान्यवर, कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे मुख्याध्यापक जाधव यांनी शाळेचा वाढता आलेख तसेच विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी शाळेतील शिक्षक जे परिश्रम घेतात.
त्याबद्दल प्रास्ताविक मांडले तदनंतर उद्घाटक म्हणून लाभलेले देगलूर बिलोली विधानसभेचे लोकप्रिय आमदार यांनी शाळेच्या सर्व कर्मचा-यांचे व पदाधिका-यांचे अभिनंदन केले सांस्कृतिक कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या तसेच येणा-या काळात शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाईल तसेच विद्यार्थ्यांचे कला कौशल्य पाहून आनंद व्यक्त केले आणि भाषणांमध्ये शाळेसाठी जो कच्चा रस्ता आहे तो पक्का करून देण्याचे आश्वासन दिले त्याचबरोबर संस्थेचे सचिव माननीय शंकररावजी इंगळे साहेब यांनी शाळेतील सर्व घटक ज्या तळमळीने कार्य करतात त्याचा उल्लेख उपस्थित केला तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत हेही सांगितले तसेच येणा-या काळात या शाळेतीचा विद्यार्थी एखादा जिल्हाधिकारी तसेच एखादा चांगला अभिनेता म्हणून तयार व्हावा अशी इच्छा व्यक्त केली सदरील शाळेस शासनाचा कुठलाही अनुदान नाही याची खंत सुद्धा इंगळे सरांनी व्यक्त केली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये देशभक्तीपर गीत व्यसनमुक्ती नाटिका तसेच भक्ती गीतावर उत्कृष्ट नृत्याचे सादरीकरण लहान लहान मुलांनी करून उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली हे सर्व गीतांचे डान्स शाळेच्या सहशिक्षिका सौ ढगे जी जी यांच्या मार्गदर्शनातून सादर केले कार्यक्रमातील नाटिका सादर करण्यासाठी शाळेतील सहशिक्षक बोडके यांनी परिश्रम घेतले तसेच शाळेतील कलाशिक्षक गाडीवान यांनी आपल्या हाताने सुंदर अशा प्रकारचे साहित्य या कार्यक्रमासाठी निर्माण केले या कार्यक्रमास प्रेक्षकांचे स्वागत करण्यासाठी व नियंत्रणासाठी शाळेतील सहशिक्षिका मानूरे पिटला, मैत्रे, कोकणे तसेच शाळेतील सहकर्मचारी भास्कर वडजे विमलबाई वडजे यांनी परिश्रम घेतले सदरील कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन पाटील पी ए यांनी केले. अनुमोदन बोडके यांनी केले आणि सर्व पालक तळमळीने काम करून सांस्कृतिक कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडण्यात आले. आभार ढगे यांनी सर्वांचे कौतुक करून आभार व्यक्त केले आणि अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम इथेच संपला असे जाहीर केले.