24.8 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडदोन दिवसापासून २६ वन मजुरांचे धरणे आंदोलन

दोन दिवसापासून २६ वन मजुरांचे धरणे आंदोलन

एकमत ऑनलाईन

हदगाव : वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत येणा-या विविध बीटामध्ये बारमाही वन मजूर म्हणून काम करणा-या २६ वन मजुरांनी शासन दराप्रमाणे मजूरी देण्यात यावी या मागणीसाठी गत दोन दिवसापासून वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत येणा-या विविध बीटामध्ये बारमाही वन मजूर मागील ६ महिन्यापासून सतत हदगाव वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत संरक्षण जाळ रेषा व जंगलाची जाळ विझवणे , सी सी टू मार्क आउट देणे व जंगलातील इतर कामे कर्मचा-याच्या आदेशावरून करित आहेत.

या २६ कामगारा पैकी २० कामगारांना तुटपुंजा मोबदला देऊन बाकीच्या ६ कामगारांना मागील ६ महिन्यापासून कुठल्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही. यामुळे शासनाच्या नियमानुसार वन मजुरांना दरदिवशी मिळणारा पगार देण्यात यावा. उर्वरित ६ मजूरांचा ६ महिन्यापासूनचा पगार देण्यात यावा. वन परिक्षेत्र हादगाव कार्यालयातील कर्मचा-याच्या मनमानी कारभाराची चौकशी करून वन मजुरांना न्याय मिळवून द्यावा या मागण्यासाठी दोन दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

या आंदोलनाकडे आतापर्यंत वनपरिक्षेत्र अधिकारी फिरकले सुद्धा नाहीत. भागोराव सूर्यवंशी,अशोक चव्हाण,शेरसिंग जाधव,बाबुराव पडघणे,शिवाजी खिल्लारे ,ताईबाई चव्हाण ,नंदाबाई शिंदे,कांताबाई पडघणे,सखुबाई सूर्यवंशी,दत्ता लाटकर,बालाजी शेबेटेवाड,उत्तम गारोळे,रमेश जाधव,शिवाजी लाटकर , लक्ष्मण डवरे , विशवनाथ बोरकर,माणिक राठोड ,स अब्जल स हुसेन, बाबू सेवा राठोड,अशोक कांबळे,मारोती मेटकरी , राजू देवडे,,अशोक राठोड,बालाजी ढोले, अनिल राठोड , प्रतीक राठोड, बापूराव वाळके इत्यादीनीं या धरणे आंदोलनात सहभाग घेतला आहे.

लेटरबॉम्बचा ‘प्रताप’!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या