22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeनांदेडइसापुर उजव्या कालव्याच्या पाण्यामुळे नुकसान

इसापुर उजव्या कालव्याच्या पाण्यामुळे नुकसान

एकमत ऑनलाईन

धर्माबाद : पाटोदा (बु) शिवरातील जवळपास ९० टक्के शेतीमध्ये उडीद, मुग, सोयाबीन पेरलेली व कापूस लावण झालेली होती. इसापुर उजव्या कालव्याच्या करखेली शाखेकडून पाटोदा (बु) कडे आलेल्या ८४०२ कालव्यातुन मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले.

सदरील पाण्यामुळे कालवा फुटुन हे पाणी मोठ्या प्रमाणात शेतामध्ये शिरले असल्यामुळे सदरील शेत जमिनी पुर्णपणे खारडुण गेले असुन. दुबार पेरणी करणेसाठी जमिन योग्य राहिलेली नाही व शेतकन्यांचे मोठ्या प्रमाणात शेत जमिनीचे नुकसान झालेले आहे. संबंधित विभागाचे शासकीय प्रतिनिधी अमीलकंठवार जे.ई व सदरील कामाचे गुत्तेदार यांचे प्रतिनीधी भिंगे साहेब यांनी प्रत्यक्षात पाहणी केली. सदरील जमिनीचे जायमोक्यावर पंचनामे करून लवकरात लवकर शेतक-यांचे झालेले नुकसान भरपाई देण्यात यावे. अन्यथा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर दिगांबर पाटील साळुंके, लोकोबा पाटील साळुंके, मारोती पाटील, शंकर मोताचे, गोविंद मेळगावे, राजू कुदळे, शेषेराव पाटील, लोकडोबा पाटील, आबाजी वानखेडे, शेषराव संभाजी वानखेडे, जक्कोजी भुजंगा वानखेडे यांच्या सह अनेक शेतक-यांच्या स्वाक्ष-या आहेत. इसापुर कालव्याच्या पाण्यामुळे काही शेतक-यांच्या शेतात पाणी शिरुन मोठ्याप्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. इस्लापूर धरणाच्या प्रशासनाने शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील शेतक-यांनी केली आह.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या