36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeनांदेडरिसनगावात अतिवृष्टीने घर कोसळुन गृहपयोगी साहित्याचे नुकसान

रिसनगावात अतिवृष्टीने घर कोसळुन गृहपयोगी साहित्याचे नुकसान

एकमत ऑनलाईन

लोहा : तालुक्यातील रिसनगाव येथील शेतकऱ्याचे राहते घर अतिवृष्टीमुळे कोसळून घरातील अन्नधान्य व घरातील संसारपयोगी साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे. सदरील घटना दि. 30 रोजी सायंकाळी साडेसहा वाजे सुमारास घडली.

मागील कांही दिवसांपासून परतीच्या पावसाने तालुक्यात प्रचंड थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच सततच्या पावसाने अनेक घरांच्या पडझाडीच्याही घटना घडल्या आहेत. लोहा तालुक्यातील रिसनगाव येथील रुखमाजी पेमराव सुरणर यांचे राहते घर क्र. 748 हे मागील सततच्या पावसाने खचले होते. दि. 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजे सुमारास सुरणर कुटुंबीय घराबाहेर बसले असता घर कोसळल्याचा अचानक मोठा आवाज झाला.

राहते घर कोसळल्याने घरातील संसारपयोगी साहित्याचे अतोनात नुकसान झाले त्यात अन्न धान्य, गृहपयोगी भांडे व इतर महत्वपूर्ण साधन साहित्याचे नुकसान झाले. यासंदर्भात घरमालक सुरणर हे महसूल कार्यालयात सदरील नुकसानी संदर्भाने माहिती नोंदविण्यासाठी गेले असता दि. 1 रोजी गुरुवारी महसूल कर्मचाऱ्यांचा संप असल्याचे सांगण्यात आल्याचे नुकसानग्रस्त घरमालक यांचा मुलगा पुंडलिक सुरणर यांनी सांगितले.

यूपी सह मध्यप्रदेश,राजस्थान मध्ये बलात्काराच्या घटना उघडकीस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या