27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeनांदेडनांदेडात पुन्हा दोन पिस्तुलांसह घातक शस्त्र जप्त

नांदेडात पुन्हा दोन पिस्तुलांसह घातक शस्त्र जप्त

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिनिधी
अवघ्या काही दिवसापुर्वी स्थागुशाखेने दरोड्यातील तयारीतील टोळीला पिस्तूल व शस्त्रासोबत पकडले होतेÞ तोच नांदेड शहरात विनापरवाना शस्त्र बाळगून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ५ जणांना स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहेÞ या कारवाईत दोन पिस्तुलांसह ४ काडतुस व दोन घातक शस्त्रे जप्त केली आहेतÞ या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे.
नांदेड शहरासह ग्रामीण भागातही गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहेÞ बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर पोलिसांनी गुन्हेगारांची शोध मोहिम सुरू केली आहेÞ रेकार्डवरील अनेक गुन्हेगारांना शस्त्रासह अटक करण्यात आलीÞ तर स्थागुशाखाने महिनाभरापुर्वी दरोड्याच्या तयारीतील टोळीला पकडले होतेÞ सध्या ते तुरूंगाची हवा खात आहेतÞ तोच नांदेड शहराजवळ असलेल्या हस्सापुर परिसरात दि.१७ मे च्या रात्रीला ५ दरोडेखोरांना गजाआड करण्यात आले आहेÞ घातक हत्यार आणि पिस्तुलसह दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळाली होती.

त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती पोलीस उपमहानरीक्षक, पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांना देऊन कार्यवाहीबाबत मार्गदर्शन घेऊन पथकाला कार्यवाहीचे आदेश दिले. पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, सहाय्यक फौजदार गोंिवद मुंडे, जसवंतंिसह साहू यांनी गस्तीदरम्यान मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून दबा धरून बसलेल्या व दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या कमलेश उर्फ आशु बालाजी ंिलबापुरे, वय २२ वर्ष रा.वसरणी, नांदेड, श्याम मुंजाजी सोनटक्के, वय २२ वर्ष रा.जुना कौठा नांदेड, शिवाजी उर्फ शिवा माधवराव, वय २३ वर्ष रा.टाकळगाव ता.लोहा, जि.नांदेड, काळेश्वर रावण जाधव, वय २५ वर्ष, रा.असर्जन व दीपक उर्फ वाघू भुजंग बुचाले, वय ३५ वर्ष रा.आवई ता.पूर्णा, यांना अटक केली आहे. या पाचही आरोपींकडून दोन पिस्तुल, ५ मोबाईल, ४ जिवंत काडतूस, दोरी, मिरचीपूड आणि अन्य घातक शास्त्र व साहित्य असा एकूण ७० हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी दत्तात्रय काळे यांनी दिलेल्या फियार्दीवरून नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात पाचही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कार्यवाहीचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, यांनी स्थागुशाचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर व त्यांच्या पथकाला कौतुकाची थाप दिलीÞ

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या