19.2 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeनांदेडजवळगाव येथे धाडसी चोरी; साठ हजारांचा ऐवज लंपास

जवळगाव येथे धाडसी चोरी; साठ हजारांचा ऐवज लंपास

एकमत ऑनलाईन

हिमायतनगर : तालुक्यातील मौजे जवळगाव येथे दि़ ३१ डिसेंबरच्या रात्री पांडुरंग नारायण रावते यांच्या घरी चोरट्यांनी धाडसी चोरी करत नगदी पन्नास हजार रूपये व सोन्याचे दागीने असा ६० हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली़ या घटनेमुळे जवळगाव परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागील अनेक दिवसापासून हिमायतनगर शहरात चोरीचे प्रमाण कमी झाले होते, पण पुन्हा एकदा जवळगाव येथे साठ हजाराची धाडसी चोरी करून चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे हिमायतनगर पोलीस प्रशासनास चोरट्यानी पुन्हा एकदा मोठे आव्हान दिले आहे़ दि़ ३० डिसेंबर ते ३१ डिसेंबर चा रात्री जवळगाव येथील पांडुरंग नारायण रावते हे आपल्या घरातील बाजूच्या दुस-या खोलीमध्ये गाढ झोपले असता, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दरवाज्याची कोंडी काढून घरात प्रवेश केला.

तसेच चोरट्यांनी घरातील सर्वजण झोपत असल्याचा फायदा घेत कपाटा मधील ५० हजार रुपये नगदी व दोन ग्रॅमचा सोन्याचा ओम असा अंदाजे साठ हजार रुपयांचा ऐवज चोरून चोरटे पसार झाले़ १ जानेवारीच्या पहाटे सदर घटना उघडकी आली़ या प्रकरणी पांडूरंग सावते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक बि.डी.भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.का. पोटे व नितीन राठोड हे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या