माहूर : कोरोना महामारीनंतर मंदीर उघडण्याची परवानगी शासनाने दिली, त्यामुळे आठ महिन्यापासून प्रतिक्षेत असलेले भाविक हरिणामासह दत्तनामाचा जयघोष करीत माहूर गडावर मोठ्या प्रमाणात दाखल झालेले दिसून येत आहेत. माहूर शहरासह लांजी,वाई बाजार,मदनापूर,अंजनखेड सह तालुक्यातील जवळपास सर्वच लहान -मोठया गावी ह्या दिंड्या काढल्या जातात.कडाक्याच्या थंडीला न जुमानता भल्या पहाटे उठून स्नान,संध्या आटोपून लहान -थोर ठराविक ठिकाणी एकत्र जमतात.पुजारी व पताकेधारी अग्रस्थानी असतात तर टाळकरी,मृदंग,हार्मोनियम,वीणा वादक व गायक मागे अशा पद्धतीने प्रभू नामाचा गजर करीत स्थानिक मंदिरात जाऊन अभंग,भूपाळ्या व आरती केल्यानंतर नगर प्रदक्षिणा घालून निघण्याच्या ठिकाणी दिंडी परतते.
ज्या-ज्या ठिकाणी दिंडीचे आयोजन केल्या जाते तिथल्या आया-भगिनी दिंडी मार्गावर सडा टाकून, रांगोळी घालून व तुळशीवृंदावनात दिवा लाऊन दिंडीक-यांचे भक्ती भावात स्वागत करतात.समाप्तीच्या दिवशी म्हणजेच कार्तिक पोर्णिमेला भक्तगण द्रोणा मध्ये दीप प्रज्वलित करून जलप्रवाहात सोडतात व सर्व प्राणीमात्रांच्या सौख्यासाठी ईश्वराकडे पसायदान मागतात.
या दिंड्यामध्ये माहूर शहरातून सुरेश शिंदे,पुंडलिक पारटकर,दिलीप पाटील,विठ्ठल मेश्राम,कामोद सोनकर,बळीरामपंत परसवाळे, दत्ता मार्गमवार,शेखर कणेर्वार, गणेश वर्मा, अमोल सवटे, अक्षय परसवाळे,विश्वनाथ परसवाळे,दत्तात्रेय गंदेवाड,प्रसाद वांगे,राजू इंगोले,प्रमोद इंगोले,मारोती दूधे,शंकर लाड,रवि दूधे,भीमराव इंगोले,नारायण दातीर,वैभव मुडाणकर तसेच मदनापूर येथील संजु महाराज,श्यामराव नेवारे,प्रवीण ठाकरे,भुमय्या कोगूरवार, संजय डोळस,प्रल्हाद टनमने,गजानन टनमने,मनोज टनमने,लक्ष्मण गोलमवार यांचेसह बालगोपाळ दररोज अति आनंदात व भक्तीभावात दिंडीत सहभागी होतात.
वरवडे टोल नाक्याजवळ २१४ किलोचा गांजा पकडला