25.4 C
Latur
Monday, March 1, 2021
Home क्राइम मुकबधीर मुलीवर बलात्कार करुन खून

मुकबधीर मुलीवर बलात्कार करुन खून

एकमत ऑनलाईन

बिलोली ( दादाराव इंगळे) : शहरातील जि.प.शाळेच्या बाजुस असलेल्या झोपडपट्टी भागात राहणा-या एका सत्ताविस वर्षीय मुक बधीर अविवाहीत मुलीवर शारीरिक अत्याचार करुन तिचा दगडाने ठेचुन खुन केल्याची घटना ९ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक केली आहे. दयानंद विठ्ठल कुडके रा.बिलोली यांंनी दिलेल्या फियार्दी वरुन बिलोली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणी घराच्या शेजारी राहणा-या एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदरिल निंदनिय घटनेचा शहरासह तालुक्यातुन तिव्र संताप व्यक्त होत आहे.

या बाबत माहीती अशी की, मयत मुलगी ही गरीब व आई वडीलांचे छत्र हरवलेली मुलगी ती जन्मा पासुनच मुकी व बहीरी होती,तीचे पालन पोशन तीची चुलत बहीन करायची. बहीन गरीब दारिद्र कुंटुब असल्याने दिवसभर मजुरीला जात असे, यामुळे घरात शौचालय नसल्याने मयत ही शौचासाठी त्या परिसरातील झुडुपात जात असे,तीची बहीन सायंकाळी पाचच्या दरम्यान घरी आल्यानंतर तीच्या बाबतीत आजु बाजुस चौकशी केली असता शेजा-यानी ती दुपार पासुनच नसल्याचे सांगुन तीला शौचास जाताना पाहील्याचे सांगितले. यावरुन तीचा शोध घेतला असता तीचा मृतदेह झुडुपात आढळुन आला.

डोक्यात व तोंडावार गंभीर दगडाने वार केल्याचे निदर्शनास आले. तसेच तिच्यावर जबरी शारिरीक अत्याचार केल्याचेही दिसुन आले. हे कृत्य कोणाला कळु नये म्हणून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी साईनाथ राम निम्मोड रा.बिलोली या आरोपीस अटक केली व तपासाला वेग आनला. मयताचे शेवविच्छेदन वैद्यकीय अधिक्षक डॉ.नागेश लखमावार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सतीश तोटावाड, डॉ.कैलाश शेळके, डॉ. तुष्कर, डॉ. बोकारे यांनी केले. यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुकबधीर मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जिल्ह्यात असंतोष पसरला असून अनेक सामाजिक, राजकीय संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देवून त्या युवतीच्या मारेक-याला कठोर शासन करावे अशी मागणी करण्यात आली आहे. सदर घटनेचा जिल्ह्यात विविध संघटना व महिला संघटनांनी तीव्र निषेध केला आहे.

लोकां सांगे ब्रह्मज्ञान अन् स्वत: …

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या