21.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home नांदेड ग्रा.पं.च्या रेकॉर्ड तपासणीसाठी आमरण उपोषण !

ग्रा.पं.च्या रेकॉर्ड तपासणीसाठी आमरण उपोषण !

एकमत ऑनलाईन

वाई बाजार : मदनापूर ग्रा.प.चे रेकॉर्ड तपासणी करण्याची मागणी दि.२३ ऑक्टोबर २०२० रोजी आपणाकडे लेखी निवेदनाव्दारे केली असतांना अद्याप चौकशी न झाल्याने गजानन पेंदोर व राजू टनमने यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.नांदेड व गटविकास अधिकारी माहूर यांना निवेदन देऊन २५ जानेवारी पासून माहूर पंचायत समिती समोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

उपोषणार्थीच्या मागण्यामध्ये सन २०१८ ते २०२० चौदाव्या वित्त आयोगातील निधी तून कोणती विकास कामे करण्यात आली. सन २०१८ ते २०२० गृहकर पासून ग्रा.प. ला किती उत्पन्न मिळाले व कोणत्या विकासकामी खर्चे झाले. ग्रा.प.चे चेकबुक, पासबुक व जमाखर्च तपासणी गावठाण लीलावाची रक्कम बँकेत ग्रा.प. खात्यात जमा केली काय, प्रत्येक कामाचे अंदाजपत्रक तपासणी व जायमोक्यावर पंचनामे करणे, स्वस्त धान्य दुकानच्या अंत्योदय यादीत २०१८ ते २०२० मध्ये किती लोकांचा समावेश केला. सन २०१८-२०२० मध्ये किती नागरिकांना व्यक्तिगत स्वच्छतागृहाचा लाभ देण्यात आला. लाभ देण्यात आला. आदी बाबीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली.

परंतु सदर प्रकरणात अद्याप कोणतीही चौकशी झालेली नाही.याबाबत गटविकास अधिकारी पंचायतसमिती माहूर यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी व्ही.आर.आरबडवार व विस्तार अधिकारी डी.व्ही,जोगपेटे यांना सदर प्रकरणाची चौकशी करून सात दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याची लेखी सुचना दि.०३ नोव्हेंबर २०२० रोजी जा. क्र.२३२१, २३२० अन्वये दिली परंतु सदर प्रकरणी काय चौकशी झाली याचा अहवाल अद्याप उपोषणाथीर्ना मिळाला नसल्याने सहाय्यक गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी हे मदनापूर ग्रा.प. च्या ग्रामसेवकाना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला असून वरिष्ठ आदेशाला बगल देणा-्या अधिका-्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करावी व उपोषणार्थीच्या मागण्याची पूर्तता करावी अशी मागणी केली असून मागणीची पूर्तता होई पर्यत दि.२५ जानेवारी २०२१ पासून माहुर पंचायतसमिती समोर आमरण उपोषण सुरु करणार असल्याचे गजानन पेंदोर राजु टनमने यांनी बोलतांना सांगितले.

हवाईदलाची ताकद आणखी वाढणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,432FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या