28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeनांदेडजमिनीच्या मालकी हक्कासाठी दोन बहीणींचे तहसीलसमोर आमरण उपोषण

जमिनीच्या मालकी हक्कासाठी दोन बहीणींचे तहसीलसमोर आमरण उपोषण

एकमत ऑनलाईन

उमरी : उमरी – शहरात असलेल्या आजोबाची शेतजमीन वारसाहक्क प्रमाणे आमच्या नावाने करण्याच्या मागणीसाठी शहरातील दोन सख्ख्या बहिणींनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरवात केली शहरातील रापतवार नगरच्या समोर असलेली शेत जमीन ही आजोबाच्या नावे होती . त्यांच्या पश्चात आमचे आई , बाबा वारसदार होते पण दुदैर्वाने दोघांचेही निधन झाल्याने ही शेत जमीन वारसाहक्क प्रमाणे आमच्या नावाने नोंद घेण्याच्या मागणीसाठी कु , रेखा बाबू पेंनेबार , कु राधा बाबू पेनेवार या दोन सख्ख्या बहिणी बुधवारी सकाळपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास न्याय मागण्यासाठी बसल्या आहेत.

दिलेल्या निवेदनात त्यांच्या आजोबांची उमरी शहराच्या हद्दीत शेत जमीन आहे आजोबांच्या निधनानंतर त्यांच्या वारसा प्रमाणे फेरफार करणे अपेक्षित होते . यात कुटुंबातील इतर सदस्यांनी माज्या बाबाचे नाव वगळून या जमिनीचा फेरफार करून इतरांना बिकण्याचा षडयंत्र चालवले आहे . यात शेतजमिनीवर आमचा कब्जा आहे या प्रकरणात न्यायालयाने वडील हयात असताना आमच्या बाजूने निकाल दिला . त्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला , एवढे होऊन महसूल विभागाने बारसाहक्क प्रमाणे आमची नोंद घेतली नाही.

यानंतर आम्ही न्याय मागण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री जिल्हाधिकारी नांदेड उप जिल्हाधिकारी धमार्बाद तहसीलदार उमरी पोलीस निरीक्षक उमरी अशा अनेक ठिकाणी खेटे मारूनही आम्हाला न्याय मिळत नाही . आमच्या आई – वडिलांच्या मृत्यूनंतरही आमच्या कुटुंबाबर सतत अन्याय व अत्याचारासह मानसिक त्रास होत असल्याचे कु . रेखा बाबू पेनेवार , कु राधा बाबू पेनेवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .

मराठा आरक्षणाचे नांदेडात पडसाद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या