20.1 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeनांदेडविजेच्या धक्क्याने वितरण कर्मचा-याचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने वितरण कर्मचा-याचा मृत्यू

बराच वेळ खांबावर लोंबकळत मृतदेह

एकमत ऑनलाईन

नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील शहापूर इथे वीज वितरण कर्मचा-याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विजेच्या खांबावर चढून काम करत असताना हा अपघात घडला. ज्ञानेश्वर ताटे असं या वीज वितरण कर्मचा-याचे नाव आहे. या अपघातानंतर बराच वेळ ज्ञानेश्वर ताटे यांचा मृतदेह खांबावर लोंबकळत होता.

वरिष्ठ तंत्रज्ञ असणारे ज्ञानेश्वर ताटे विजेच्या खांबावर काम करत होते, परंतु अचानक वीज प्रवाह सुरु झाल्याने शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे काम करत असताना यासाठी फोन परमिट घेण्यात आले होते. तरीही वीज प्रवाह कसा सुरु झाला, याचे नेमकं कारण काय? याची चौकशी होणे गरजेचे आहे. मृत्यू झाल्यानंतर त्या घटनेची दखल घेऊन मृतदेह खांबावरून खाली घेणे गरजेचं होतं. पण या अपघातानंतर बराच वेळ ज्ञानेश्वर ताटे यांचा मृतदेह खांबावर लोंबकळत

दोन महिन्यातील दुसरी घटना
वीज कर्मचा-याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू होण्याची ही दोन महिन्यातली दुसरी घटना आहे. याआधी ३ फेब्रुवारी रोजी हदगाव तालुक्यातील मौजे रावणगाव शिवारात वीज पुरवठा करणा-या डीपीवर काम करण्यासाठी गेलेले वीज कर्मचारी अवधूत नागोराव शेट्टे यांचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या