24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeनांदेडविजेच्या धक्क्याने मजूराचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने मजूराचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नांदेड : नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यालगत लाईटचे पोल बदलण्याचे काम सुरू असून शहरात असलेल्या वळण रस्त्यावर काम करताना विजेचा जबर शॉक लागल्याने भंडारा जिल्ह्यातील एका २२ वर्षीय मजुराचा मृत्यू झाल्याची घटना दि. १८ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.

नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. पूर्वीचे रस्त्यालगतचे विद्युत पोल हटवून ते बाजूला उभे करण्याचे काम केल्या जात आहे. भंडारा जिल्ह्यातील आमगाव बूथ ता. साकोळी येथील तबरेज शेख माजीद अगवान (वय २२) हा मागील चार महिनंपासून सदर कामावर होता. दररोजप्रमाणे तबरेज शेख हा सकाळी लोहा शहरालगत दोन किमी अंतरावर असलेल्या बेरळी फाट्याच्या वळण रस्त्याच्या वीज पोल बदली कामावर हजर झाला. दुपारी एक वाजता अचानक तेथील सर्व्हिस वायर मधून वीज प्रवाहित होवून तबरेजच्या उजव्या हाताला विजेचा जबर शॉक लागून तो बेशुद्ध झाला.

त्यानंतर तबरेज यास उपचारार्थ लोह्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिका-यांनी तबरेज यास मृत घोषित केले. याप्रकरणी गुत्तेदार ओमकार शरद नरोटे यांनी दिलेल्या माहितीवरून लोहा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोहेकॉ ए. एम. केंद्र हे करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या