मांडवी ( प्रतिनिधी ) देशासह महाराष्ट्रात कोराना विषाणू संसर्ग रोगाने हजारो लोकांची बळी घेतला असताना मांडवी परिसर मात्र कोरोना मुक्त होता पण मांडवीतील एका पोलीस शिपाईचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली
मांडवी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई संतोष माधावअप्पा मठपती वय 30 वर्ष (मुळगाव.बडूर ता.बिलोली )दि .1ऑक्टोबर रोजी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे पोलीस विभागासह पोलीस वसाहतीत भीतीचे वातावरण पसरले आहे
दिनांक1 ऑक्टोबर रोजी मांडवी पोलीस ठाण्यात सपोनि संतोष केंद्रे,उप निरीक्षक शिवप्रसाद कराळे ,विजय कोळी सह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी मठपती यांना श्रद्धांजली वाहिली पोलिसांनी कर्तव्या बरोबर आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी व जनतेने सुद्धा सुरक्षित अंतर ठेवून मास्क ,सॅनिटाइजर वापरावे विनाकारण घराबाहेर निघणे टाळून कोराना संकटावर मात करावे असे आव्हान सपोनि संतोषकेंद्रे यांनी जनतेला केले आहे.
व्हीव्हीआयपींसाठीचे विमान दाखल