16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeनांदेडरेल्वेखाली चिरडून तरुण-तरुणीचा मृत्यू

रेल्वेखाली चिरडून तरुण-तरुणीचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

भोकर : आदिलाबादहून मुंबईकडे जाणारी नंदिग्राम एक्स्प्रेस रेल्वे शुक्रवार दि. ११ नोव्हेंबर रोजी दूपारी अंदाजे साडेतीन वाजेच्या सुमारास रेल्वेगेट जवळ येताच एक तरुण व एक तरुणी रेल्वे पटरी ओलांडत असताना रेल्वेखाली आल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भोकर शहरात घडली. सदर झालेली घटना पाहण्यासाठी एकच गर्दी झाली.

शहराच्या मध्यभागी रेल्वे गेट असल्यामुळे या ठिकाणी नागरिकाची ये जा मोठया प्रमाणात असते. आदिलाबाद-मुंबई हे विशेष रेल्वे गाडी अंदाजे साडेतीन वाजता दुपारी रेल्वे गेट जवळ आली असता हा भयानक अपघात घडला असून रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी येत आहे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव शिवराम क्याटमवार (२१) व मुलीचे नाव धारा मोरे रिठा तालुका भोकर अशी माहिती मिळाली. दोघांच्या या दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या