23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeनांदेडपेट्रोलच्या भडक्यात आई-वडिलांसह पुत्राचा मृत्यू

पेट्रोलच्या भडक्यात आई-वडिलांसह पुत्राचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नांदेड : पिकांवर फवारणी करण्याच्या पंपामध्ये पेट्रोल टाकत असताना, ओढत असलेली बिडी पेट्रोलवर पडल्याने आगीचा भडका उडाला. यात एकाच कुटूंबातील आई-वडिलांसह पुत्र अशा तिघांचा जळून मृत्यू झाल्याची घटना, देगलूर तालूक्यातील बल्लूर येथे घडली.

सध्या खरीपातील सोयाबीन, कापूस, तूर, मुग पिके बहरली असून, ग्रामीण भागात शेतकरी या पिकांवर औषध फवारणी करताना दिसत आहेत. सदर पिकांवर किटकांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी किटक नाशक फवारत आहेत. दरम्यान देगलूर तालूक्यातील बल्लूर येथे दि. ५ रोजी फवारणीच्या पंपामध्ये पेट्रोल टाकत असताना पेट्रोलचा भडका होऊन एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाला.

बल्लूर येथील सुर्यकांत माधवराव सक्रपा वय ५२, कपिल सुर्यकांत सक्रपा वय २४, गंगूबाई सुर्यकांत सक्रपा ५० हे तिघेजन पिकांवर औषध फवारणीचे काम करत होते. त्यावेळी मुलगा कपिल हा फवारणी करण्याच्या पंपामध्ये पेट्रोल टाकत असताना त्यांचे वडील हे बिडी ओढत होते. त्यावेळी अचानक ते ओढत असलेली बिडी पेट्रोलवर पडल्याने पेट्रोलचा मोठा भडका उडाला. ज्यात तेथे असलेले कपिल, सुर्यकांत आणि गंगुबाई हे तिघेही गंभीर भाजले. त्यानंतर त्यांना विष्णूपुरी येथील शासकीय रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असता, त्यांचा उपचारा दरम्यान तिघांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी स्वाती सुर्यकांत सक्रपा यांच्या फिर्यादीवरून देगलूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घडलेल्या दुर्दैवी घटनेत एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या