नांदेड : राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात लवकरच पोलीस पाटील कृती समितीच्या पदाधिका-यांसोबत बैठक घेवून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उप मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्रातील पोलीस पाटलांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या कृती समितीच्या वतीने २१ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान, मोर्चा काढण्यात आला. या मोचार्तील शिष्टमंडळाकडून पोलीस पाटलांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन स्विकारून कृती समितीच्या पदाधिका-यांसोबत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोल्लेखित आश्वासन दिले, अशी माहिती राज्य उपाध्यक्ष तथा राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील खंडेराव बकाल पाटील यांनी दिली.